जगभरात कोरोना मृत्यूंची आकडेवारी ५० लाखाच्या पुढे

जगभरात कोरोना मृत्यूंची आकडेवारी ५० लाखाच्या पुढे

कोविड-१९ महासाथीने जगभरात आतापर्यंत ५० लाखाहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. कोविड-१९चे सर्वाधिक मृत्यू अमेरिका,

‘मंदिरातील प्रसादावर, त्या दिवस ढकलत आहेत’
कोविड-१९- तिसरी लाट रोखण्याच्या सूचना जाहीर
भाजप आमदाराच्या वाढदिवसाला २०० नागरिक

कोविड-१९ महासाथीने जगभरात आतापर्यंत ५० लाखाहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. कोविड-१९चे सर्वाधिक मृत्यू अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको व भारतातले असून जगभरातला गेल्या वर्षीचा मृत्यूचा आकडा २५ लाख होता. या वर्षात केवळ ८ महिन्यात या आकड्यात दुपटीने वाढ होऊन तो ५० लाख इतका झाला आहे. कोरोना विषाणूतील बदलामुळे (व्हेरिएंट) मृत्यूंची संख्याही वाढली आहे. गेल्या आठवड्यात जगभरात कोविड-१९चे ८ हजार मृत्यू झाले असून प्रत्येक मिनिटाला ५ मृत्यू होत आहेत. पण हा आकडा खाली येत असल्याचे रॉयटर्सचे म्हणणे आहे.

सध्या कोविड-१९ प्रतिबंधित लसीकरणाची मोहीम जगभर वेगाने सुरू असला तरी कोविड-१९ विषाणूचा संसर्ग आटोक्यात आलेला नाही. अनेक देशांमध्ये लसीचा पहिला टप्पाही पार पडलेला नाही. रॉयटर्सच्या मते अर्ध्या जगाने लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर दुसरीकडे श्रीमंत देशांनी मात्र लसीकरणाची मोहीम यशस्वीरित्या पार केली आहे.

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने कोवॅक्स मोहिमेला बळ देण्याचे सांगितले. ज्या देशांमध्ये कोविड लसीकरण झालेले नाही, त्या देशांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

अमेरिकेते कोविड मृत्यूंचा आकडा ७ लाखाच्या पुढे

गेल्या पावणे दोन वर्षांत अमेरिकेत ७ लाख कोविड मृत्यू झाले. संपूर्ण जगात कोविड मृत्यूंची सर्वाधिक आकडेवारी अमेरिकेत नोंद झाली आहे. अमेरिकेमध्ये कोविड लस घेण्याविरोधात व लसीकरणासंदर्भात गैरसमज पसरवण्याचे प्रकार कमी झालेले नाही. अमेरिकेत कोविड संसर्गाचा दर कमी होताना दिसत असला तरी हिवाळा सुरू झाल्यानंतर संसर्ग वाढेल अशी भीती अमेरिकी आरोग्य प्रशासनाने व्यक्त केली आहे.

शुक्रवारी रशियात ८८७ कोविड मृत्यूंची नोंद झाली. गेल्या काही दिवसांतील ही सर्वाधिक आकडेवारी आहे. रशियात केवळ ३३ टक्के नागरिकांना लसीचा पहिलाच डोस देण्यात आला आहे.

दक्षिण अमेरिकेत जगभरातल्या एकूण कोविड मृत्यूंपैकी २१ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर युरोपचा क्रमांक लागतो.

भारतामध्ये कोविड डेल्टा विषाणू संसर्गही वाढत आहे. गेल्या काही दिवसांत मृत्यूचा आकडा दरदिवशी ४ हजार ते ३०० दरम्यान असा कमी-जास्त आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: