सरकारी बँकांच्या संपाने ग्राहकांची प्रचंड गैरसोय

सरकारी बँकांच्या संपाने ग्राहकांची प्रचंड गैरसोय

नवी दिल्लीः सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात दोन दिवसांचा संप शुक्रवारी संपला, पण या संपाने संपूर्ण देशभरात लाखो बँक ग्राहकांची गैरसोय झाली, शिव

मोठा कट उघड : भाजप पदाधिकाऱ्याला अटक
धंदा पाहावा करून…
एका वर्षात मुद्रा योजनेतील एनपीए झाले दुप्पट

नवी दिल्लीः सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात दोन दिवसांचा संप शुक्रवारी संपला, पण या संपाने संपूर्ण देशभरात लाखो बँक ग्राहकांची गैरसोय झाली, शिवाय बँकेचे व्यवहारही विस्कळीत झाले. हा संप अखिल भारतीय बँक अधिकारी संघ, अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ, राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटना यांच्यासहित ९ बँकांच्या युनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन संघटनेने पुकारला होता. या संपात देशातील सुमारे ७ लाख कर्मचारी सामील झाले होते, असा दावा करण्यात आला आहे.

या चालू वित्तीय वर्षांत २ सरकारी बँकांचे खासगीकरण होणार आहे, या विरोधात गुरुवारी व शुक्रवारी बँक संघटनांनी संप पुकारला होता. हा संप दोन दिवसांचा असल्याने भारतीय स्टेट बँकेने आपले व्यवहार विस्कळीत होतील असे पूर्वीच ग्राहकांना सांगितले होते. तरीही बहुसंख्य ग्राहकांना या संपाची माहिती नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. या दोन दिवसांत धनादेश वटवणे, जमा करणे पासून कर्ज, ठेवी व अन्य बँक व्यवहार विस्कळीत झाले. याचा मनस्ताप ग्राहकांना झाला.

गुरुवारी मुंबईत आझाद मैदानात सुमारे ५ हजार बँक कर्मचार्यांनी धरणे धरले होते. यात सफाई कर्मचार्यापासून वरिष्ठ अधिकारी सामील होते, असे यूएफबीयूचे राज्य समन्वयक देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. चेन्नईतही अनेक बँक कर्मचार्यांनी काळी फित लावून सरकारविरोधात निदर्शने केली. जयपूरमध्ये एसबीआयच्या आंबेडकर सर्कल शाखेजवळ बँक कर्मचार्यांनी निदर्शने केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0