बिहारमध्ये जेडीयू-राजदने बहुमत जिंकले, भाजपचा सभात्याग

बिहारमध्ये जेडीयू-राजदने बहुमत जिंकले, भाजपचा सभात्याग

पटनाः बिहार विधानसभेत बुधवारी जेडीयू व राजदच्या महागठबंधन सरकारने बहुमताचा ठराव जिंकला. या ठरावादरम्यान भाजपने सभात्याग केला. बुधवारी महागठबंधन सरक

मुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८
नैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ
बिहारमध्ये नितीश विरोधासोबत बेरोजगारीची लाट

पटनाः बिहार विधानसभेत बुधवारी जेडीयू व राजदच्या महागठबंधन सरकारने बहुमताचा ठराव जिंकला. या ठरावादरम्यान भाजपने सभात्याग केला.

बुधवारी महागठबंधन सरकार विधानसभेत बहुमत ठरावाला सामोरे जाणार असतानाच सीबीआयने सकाळीच राजदच्या काही नेत्यांच्या घरावर छापे टाकले. या कारवाईने राजकारण तापले होते. सीबीआयचा दावा होता की त्यांची कारवाई राजदच्या काही नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात होती.

सीबीआयच्या या कारवाई बरोबर बिहार विधानसभेच्या अध्यक्षांनी विजय कुमार सिन्हा यांनी राजीनामा दिल्याने राजकीय पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता बळावली होती. पण उपसभापती महेश्वर हजारी यांनी उपस्थित आमदारांची संख्या मोजण्याची विनंती स्वीकारल्याने नवे महागठबंधन सरकारने बहुमताचा आकडा सहज गाठला. या सरकारच्या बाजूने १६० आमदारांनी पाठिंबा दिला तर विरोधात एकही मत पडले नाही. भाजपने सभात्याग केला. एआयएमआयएमचे एकमेव आमदार अख्तरुल इमाम यांनीही महागठबंधन आघाडीला पाठिंबा दिला.

बहुमत जिंकल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुमारे अर्धा तास भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी लोजपच्या चिराग पासवान यांच्या बंडाचा अप्रत्यक्ष संदर्भ देत जेडीयूमध्ये फूट पडण्यासाठी भाजपने आरसीपी सिंग यांच्या मार्फत कसे प्रयत्न सुरू केले याचा पर्दाफाश केला. नितीश कुमार यांनी आपल्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार बनण्याची कोणतीही इच्छा नसल्याचेही स्पष्ट केले. भाजपचा त्यांनी आरोपही स्पष्ट शब्दांत फेटाळला. नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता हे केवळ प्रचार प्रसार करतात असा आरोप केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: