बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकाची भ्रष्टाचारप्रकरणी हकालपट्टी

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकाची भ्रष्टाचारप्रकरणी हकालपट्टी

नवी दिल्लीः नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)चे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री यांची आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी हकालपट्

बुलेट ट्रेनसाठी ६० टक्के भूसंपादन पूर्ण
बुलेट ट्रेनसाठी ५४००० तिवरांची कत्तल
मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेनची मागणी

नवी दिल्लीः नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)चे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री यांची आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी हकालपट्टी करण्यात आली. ७ जुलैला या संदर्भातील एक पत्र रेल्वे बोर्डाने प्रसिद्ध केले असून आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचार केल्यामुळे सतीश अग्निहोत्री यांना सेवेतून बरखास्त करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

अग्निहोत्री यांच्या बरखास्तीनंतर एनएचएसआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी राजेंद्र प्रसाद यांची तीन महिन्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

भ्रष्टाचारप्रकरणी अग्निहोत्री यांची चौकशी करावी असे निर्देश ३ जूनला लोकपाल न्यायालयाने सीबीआयला दिले होते. अग्निहोत्री यांनी भ्रष्टाचार करण्याबरोबर अनेक कंत्राटे आपल्या जवळच्या नातेवाईकांना वा खासगी कंपन्यांना दिल्याचा आरोप होता. अग्निहोत्री यांच्यावरचे आरोप हे ते रेलविकास निगम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक असताना करण्यात आले होते. रेलविकास निगम लिमिटेडमध्ये २०१०-१८ या दरम्यान अग्निहोत्री यांचा सेवाकाल होता. निवृत्तीनंतर ते नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड या कंपनीत रुजू झाले. पण जुलै २०२१मध्ये त्यांच्याकडे एनएचएसआरसीएलची जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच महिन्यात ३० सप्टेंबर २०२१मध्ये अग्निहोत्रींविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यात आली. अग्निहोत्री यांनी कोट्यवधी रुपयांची कंत्राटे नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडला दिल्याचा आणि या कंत्राटांमुळे नवयुग कंपनीने अग्निहोत्री यांना दिल्लीत एक आलिशान घर दिले व मुलीला नोकरी दिल्याचा आरोप तक्रारीत होता. त्याच बरोबर अग्निहोत्री व त्यांच्या निकटच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत रेल्वे मंत्रालयाचे १,१०० कोटी रु. अनधिकृतपणे कृष्णपट्टणम रेल कंपनी लिमिटेड या कंपनीला पुरवल्याचा आरोप होता.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0