सीडीएस नियुक्तीचे निकष केंद्राने बदलले

सीडीएस नियुक्तीचे निकष केंद्राने बदलले

नवी दिल्लीः भारतीय लष्कर दलाच्या तिन्ही विभागांच्या प्रमुखपदासाठीचे सरकारने निकष बदलले आहेत. आता लेफ्ट. जनरल, एअर मार्शल, व्हाइस अॅडमिरल पदावर कार्यरत

पायलटची चूक व खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले
रावत तिन्ही दलाचे नवे प्रमुख, नरवणे नवे लष्करप्रमुख
हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १३ ठार

नवी दिल्लीः भारतीय लष्कर दलाच्या तिन्ही विभागांच्या प्रमुखपदासाठीचे सरकारने निकष बदलले आहेत. आता लेफ्ट. जनरल, एअर मार्शल, व्हाइस अॅडमिरल पदावर कार्यरत असलेले वा ६२ वयाखालील निवृत्त झालेले अधिकारी तिन्ही दलाच्या प्रमुखपदी नियुक्त होऊ शकतात.

गेल्या वर्षी ८ डिसेंबरला देशाच्या तिन्ही लष्करदलाचे प्रमुख जनरल (सीडीएस- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर कोणाचीही नियुक्ती झाली नव्हती. या पदावर गेल्या महिन्यात निवृत्त झालेले लष्करप्रमुख नरवणे यांची नियुक्ती होणार असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमात येत होत्या पण प्रत्यक्षात सरकारने असा कोणताही अंतिम निर्णय घेतला नव्हता. सोमवारी सरकारने एअर फोर्स, आर्मी व नेव्ही अॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत सध्या सेवेत असलेले वा निवृत्त लेफ्ट. जनरल, एअर मार्शल वा व्हाइस अॅडमिरल हे तिन्ही दलाचे प्रमुख पदी नियुक्त होऊ शकतात अशी दुरुस्ती केली आहे. सरकारने सीडीएसचा कार्यकाल वाढूही शकतो व या पदावर ६५ वर्षांपर्यंत कार्यरत राहात येईल अशीही दुरुस्ती केली आहे.

सध्या लष्करातील हवाई दल, नौदल, भूदल प्रमुखांसाठीची वयोमर्यादा ६२ एवढी निश्चित करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: