३ वर्षांत सुमारे ३ लाख ९२ हजार भारतीयांनी नागरिकत्व सोडले

३ वर्षांत सुमारे ३ लाख ९२ हजार भारतीयांनी नागरिकत्व सोडले

नवी दिल्लीः गेल्या तीन वर्षांत ३ लाख ९२ हजार भारतीय नागरिकांनी आपल्या नागरिकत्वावर पाणी सोडले आहे. यातील बहुसंख्य नागरिकांनी अमेरिकेचे नागरिकत्व पत्कर

व्यक्ती, नागरिक आणि नागरीकत्व
‘एनआरसी’ : जर्मनीतील राईश नागरिकत्व कायद्यासारखा
६ लाखाहून अधिक जणांनी नागरिकत्व सोडले

नवी दिल्लीः गेल्या तीन वर्षांत ३ लाख ९२ हजार भारतीय नागरिकांनी आपल्या नागरिकत्वावर पाणी सोडले आहे. यातील बहुसंख्य नागरिकांनी अमेरिकेचे नागरिकत्व पत्करल्याची माहिती मंगळवारी लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली.

२०१९, २०२०, २०२१ या तीन वर्षांच्या काळात ३ लाख ९२ हजार ६४३ भारतीय नागरिकांनी आपले नागरिकत्व सोडले. या पैकी १ लाख ७० हजार ७९५ जणांनी अमेरिका, ६४,०७१ जणांनी कॅनडा, ५८,३९१ जणांनी ऑस्ट्रेलिया, ३५,४३५ जणांनी ब्रिटन, १२,१३१ जणांनी इटली, ८,८८२ जणांनी न्यूझीलंड, ७,०४६ जणांनी सिंगापूर, ६,६९० जणांनी जर्मनी, ३,७५४ जणांनी स्वीडन, ४८ जणांनी पाकिस्तान व काहींनी अन्य देशांचे नागरिकत्व स्वीकारले.

भारतीय नागरिकत्व सोडण्यामागे व्यक्तिगत कारणे अधिक असून नागरिकत्वाचा त्याग केलेल्यांनी जगभरातील १२० देशांचे नागरिकत्व स्वीकारल्याचे नित्यानंद राय यांनी परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सांगितले.

२०१६ पासून भारताचे नागरिकत्व सोडण्याचीही आकडेवारी अधिक आहे. २०१७मध्ये १ लाख ३३ हजार ४९, २०१८मध्ये १ लाख ३४ हजार ५६१, २०१९मध्ये १ लाख ४४ हजार १७, २०२०मध्ये ८५ हजार २४८ व २०२१ या वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यात १ लाख ११ हजार २८७ नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: