जम्मू-काश्मीर राज्यपालांच्या सूर्य मंदिरातील पूजेवर पुरातत्व खाते नाराज

जम्मू-काश्मीर राज्यपालांच्या सूर्य मंदिरातील पूजेवर पुरातत्व खाते नाराज

नवी दिल्लीः जम्मू व काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यबाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी अनंतनाग येथील मार्तंड सूर्य मंदिरात जाऊन पूजा केल्याने भा

‘सुडाचे राजकारण सोडून तज्ज्ञांचे सल्ले घ्या’
स्तुती नको, कृती हवी – ग्रेटा थनबर्गची यूएस काँग्रेसकडे मागणी
बाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष

नवी दिल्लीः जम्मू व काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यबाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी अनंतनाग येथील मार्तंड सूर्य मंदिरात जाऊन पूजा केल्याने भारतीय पुरातत्व खात्याने नाराजी व्यक्त केली आहे. पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असलेल्या प्राचीन मंदिरात जाऊन पूजा करणे नियमभंग असून काश्मीरातील अनंतनाग येथील मार्तंड सूर्य मंदिरात पूर्वपरवानगी शिवाय मनोज सिन्हा यांनी पूजा केली. हा नियमभंग असल्याचे पुरातत्व खात्याचे म्हणणे आहे. पुरातत्व खात्याने हे प्रकरण केंद्रशासित प्रशासनाकडे चौकशीसाठी पाठवले आहे.

सोमवारी मनोज सिन्हा यांनी विनापरवानगी मार्तंड सूर्य मंदिरात जाऊन नवग्रह अष्टमंगलम पूजा केली. हे मंदिर प्राचीन असून पुरातत्व खात्याच्या नियमानुसार प्राचीन मंदिरात जाऊन पूजा करण्यास मनाई आहे. पण सिन्हा यांनी हे नियम मोडून बाहेरच्या राज्यातील काही पुरोहित बोलावले होते व त्यांच्या साक्षीने पूजा केली. मनोज सिन्हा यांच्या या कृतीवर प्रतिक्रिया देताना नायब राज्यपाल कार्यालयाने सिन्हा यांनी मंदिरात प्रवेश न करता मंदिराबाहेर पूजा केली असे सांगितले. पण पुरातत्व खात्याच्या मते मंदिराच्या आवारातही पूजा करण्यास मनाई आहे.

१९५९च्या पुरातत्व कायद्यातील ७ (१) नियमानुसार प्राचीन मंदिरात व ठिकाणी कोणतीही सभा, चर्चासत्र, बैठक, भोजनावळी, मनोरंजन कार्यक्रम, परिषदा यांनी बंदी आहे.

अनंतनाग येथील मार्तंड सूर्य मंदिर आठव्या शतकातील असून ते भारतीय प्राचीन संस्कृतीचा एक ऐतिहासिक वारसा म्हणून जगभर ओळखला जाते. या मंदिरावर १३८९ व १४१३ रोजी सिकंदर शहा मिरी याने आक्रमण केले होते.

मार्तंड मंदिरात जाऊन भजन म्हणण्याची एक घटनाही ६ मे रोजी घ़डली होती. महाराजा रुद्रनाथ अनहाद महाकाल यांनी सुमारे १०० भाविकांसह मार्तंड मंदिरात जाऊन भजने म्हटली. या भाविकांकडे भगव्या रंगाचा ओम असा शब्द लिहिलेला एक झेंडा होता तर काहींच्या हातात भारताचा झेंडा होता. हे भाविक हर हर महादेवचा घोष करत होते. काही भाविक शंखध्वनीही करत होते.

या प्रार्थनेबाबत रुद्रनाथ यांनी सांगितले की, काश्मीर हे भारत मातेचे डोके व मेंदू असून आम्ही भारत मातेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी येथे आलो आहोत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: