परदेशी शिष्टमंडळाच्या काश्मीर दौऱ्याचे गौडबंगाल

परदेशी शिष्टमंडळाच्या काश्मीर दौऱ्याचे गौडबंगाल

‘द श्रीवास्तव ग्रुप’ स्वत:ला व्यावसायिक म्हणून सांगत असला तरी ‘आरओसी’च्या (ROC) वेबसाइटवर गेल्यास या कंपनीच्या कोणत्याही आर्थिक उलाढाली दिसत नाहीत. असे असताना हा ग्रुप युरोपियन युनियनच्या संसद सदस्यांच्या काश्मीर दौऱ्याचा आर्थिक भार का उचलत आहे व कशासाठी हा प्रश्न उपस्थित होतो. हा ग्रुप या संसद सदस्यांपर्यंत कसा पोहोचला, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कसा संपर्क साधला, नंतर सरकारकडून काश्मीर दौरा कसा आखला गेला अशा प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

‘काश्मीर प्रश्न भारताचा अंतर्गत प्रश्न, आम्ही हस्तक्षेपाच्या विरोधात’
लुकाशेंको आणि हैराण युरोप
ब्रेक्झिट कराराबाबतचा महत्त्वाचा ठराव ब्रिटिश संसदेत नामंजूर

जम्मू व काश्मीरमधील परिस्थिती समजून घेण्यासाठी युरोपियन युनियनच्या २३ संसद सदस्यांची दोन दिवसांची काश्मीर भेट चर्चेत आली आहे. ही भेट व त्यांचा कार्यक्रम आखण्यामागे ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉन-अलाइन्ड स्टडिज’ (आयआयएनएस) नावाची फारशी कुणाला परिचयाची नसलेल्या संस्थेचा हातभार आहे. या संस्थेला मदत मिळतेय ती ‘द श्रीवास्तव ग्रुप’ या एका कंपनीकडून. या कंपनीच्या वेबसाइटवर गेल्यास ही कंपनी स्वच्छ ऊर्जा, अवकाश, नैसर्गिक संसाधन, सल्लागार सेवा, आरोग्य, मुद्रित प्रसारमाध्यमे व प्रकाशन या क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून येते. या कंपनीच्या वेबसाइटवर खालील मजकूर लिहिलेला आहे. तो असा : “Believe in change, and the change will believe in you. We believe in saying no to thousands of projects, so that we can really focus on the few that are truly important and meaningful to us. We believe in deep collaboration and cross-pollination of our various sectors we harbour, which allow us to innovate in a way that others cannot. We don’t believe in settling for anything less than excellence in every group in the company, and we have the self-honesty to admit when we’re wrong and the courage to change.”

या कंपनीची ‘रजिस्टार ऑफ कंपनी’वरून (ROC) अधिक माहिती पडताळल्यास असे दिसून येते की ‘द श्रीवास्तव ग्रुप’चा व्यवसाय फारसा दिसत नाही तरीही या कंपनीकडून युरोपियन युनियनच्या २३ सदस्यांच्या काश्मीर दौऱ्याचा आर्थिक खर्च उचललेला दिसतो.

‘द श्रीवास्तव ग्रुप’मध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये दोन संचालक दिसतात. एक आहेत अंकित श्रीवास्तव व दुसऱ्या नेहा श्रीवास्तव. ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉन-अलाइन्ड स्टडिज’ (आयआयएनएस)मध्ये जे दूरध्वनी क्रमांक दिले आहेत त्यांची नोंदणी अंकित श्रीवास्तव यांच्या नावावर असल्याचे दिसून येते.

‘द श्रीवास्तव ग्रुप’ व ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉन-अलाइन्ड स्टडिज’ (आयआयएनएस)या दोघांचा पत्ता एकच आहे तो म्हणजे ‘ए-२/५९, सफदरजंग एन्क्लेव्ह, दिल्ली’. या ग्रुपकडून ‘न्यू दिल्ली टाइम्स’ प्रकाशित केला जातो. हे वर्तमानपत्र प्रत्यक्षात दिसत नाही. त्याची वेबसाइट व ट्विटर हँडलही दिसत नाही.

दोन दिवसांपूर्वी ‘द वीक’मध्ये श्रीवास्तव ग्रुपमार्फत बनावट न्यूज साइट चालवल्या जातात याबाबत एक वृत्तांत प्रसिद्ध झाला होता. हा ग्रुप ब्रुसेल्स येथून बातम्यां प्रसारित करत असतो. या बातम्यांमध्ये रशिया टुडेच्या बातम्या अधिक असतात.

या ग्रुपची बेल्जियम, स्वित्झर्लंड, कॅनडा व नवी दिल्ली येथे कार्यालये आहेत. जिनिव्हा कार्यालयाचा दिलेला दूरध्वनी क्रमांक अस्तित्वात नाही. कॅनडातील एडमंटन येथे कार्यालयाचा दिलेला पत्ता ‘इन व्होग वेडिंग अँड इव्हेंट्स’ या एका लग्नसमारंभ आयोजित करणाऱ्या कंपनीचा आहे.

श्रीवास्तव ग्रुप स्वत:ला व्यावसायिक म्हणून सांगत असला तरी ‘आरओसी’च्या (ROC) वेबसाइटवर गेल्यास या कंपनीच्या कोणत्याही आर्थिक उलाढाली दिसत नाहीत. असे असताना हा ग्रुप युरोपियन युनियनच्या संसद सदस्यांच्या काश्मीर दौऱ्याचा आर्थिक भार का उचलत आहे व कशासाठी हा प्रश्न उपस्थित होतो. हा ग्रुप या संसद सदस्यांपर्यंत कसा पोहोचला, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कसा संपर्क साधला, नंतर सरकारकडून काश्मीर दौरा कसा आखला गेला अशा प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

या कंपनीची माहिती मिळाल्यानंतर असेही लक्षात येते की, या कंपनीचे नेहा व अंकित श्रीवास्तव हे दोनच सदस्य सात कंपन्यांचे संचालक असून त्या सात कंपन्यांपैकी तीन कंपन्या बंद आहेत.

‘ए२एन ब्रॉडकास्टिंग लिमिटेड’ कंपनीला गेल्या वर्षी दोन हजार कोटी रु.चा तोटा झाल्याचे दिसून येते. पण या कंपनीचे कोणतेही भांडवल व महसूल आढळून येत नाही. या कंपनीची सिटीबँकमध्ये १० हजार रु.ची जमा आहे तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये १० हजार रु.ची शिल्लक आहे.

‘श्रीवास्तव मेडिकेअर प्राय. लिमिटेड’चे भांडवल १ लाख रु.चे असून २०१८च्या आर्थिक वर्षात त्याचा तोटा २ लाख ४८ हजार रु. दाखवण्यात आलेला आहे.

‘न्यू दिल्ली एव्हिएशन’चे भागभांडवल १ लाख रु.चे आहे व ही कंपनी पर्यटन व्यवसायात कार्यरत आहे.

‘ए२एन एनर्जी सप्लाय’ या कंपनीचे भांडवल १ लाख रु. असून ही कंपनी पाण्याच्या व्यवसायात आहे.

‘श्रीवास्तव ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड’चे भागभांडवलही १ लाख रु. इतके आहे.

‘एएनआर हेल्थकेअर प्राय. लिमिटेड’चे भांडवल १ लाख असून त्यांचा गेल्या वर्षीचा तोटा ३१ लाख ५६ हजार रु. इतका दाखवण्यात आला आहे.

‘द वायर’ने या कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1