यंदाही मोदी सरकारकडून आंबेडकर पुरस्कारांची घोषणा नाही

यंदाही मोदी सरकारकडून आंबेडकर पुरस्कारांची घोषणा नाही

यंदाही नरेंद्र मोदी सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने पुरस्काराची घोषणा झाली नाही. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले त्यानंतर एकाही वर्षी हा पुरस्कार सरकारने घोषित केलेला नाही.

कुळकथा चैत्यभूमीची…
गांधी – आंबेडकर संवादाच्या वाटा
आंबेडकरांना राष्ट्रीय भाषा संस्कृत हवी होतीः बोबडे

यंदाही नरेंद्र मोदी सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने पुरस्काराची घोषणा झाली नाही. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले त्यानंतर एकाही वर्षी हा पुरस्कार सरकारने घोषित केलेला नाही.

१९९२मध्ये डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराची व पुढे १९९५मध्ये डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली होती.

डॉ. बाबासाहेब राष्ट्रीय पुरस्काराची रक्कम १० लाख रु. असून डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराची रक्कम १५ लाख रु. इतकी ठेवण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार आंबेडकरी विचारधारेवर काम करणाऱ्या व्यक्तिंना दिला जातो तर डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विषमता व अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना वा एखाद्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दिला जातो.

हे दोन्ही पुरस्कार डॉ. आंबेडकर फाउंडेशनकडून दिले जातात. पण या फाउंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांनी २०२२ रोजी हे पुरस्कार काही प्रशासकीय कारणांमुळे दिले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले. वास्तविक २०१५मध्ये हेच कारण फाउंडेशनने दिले होते. महत्त्वाची बाब म्हणजे २००१ नंतर एकाही व्यक्तिला डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. त्या मागेही प्रशासकीय कारणांचा दाखला देण्यात आला होता. यूपीए सरकारच्या काळातही हे पुरस्कार देण्यात आले नव्हते.

यंदा फाउंडेशनने पुरस्कार नामांकन दाखल करण्याची जाहिरात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केली होती. म्हणजे अत्यंत कमी वेळ त्यांनी दिला होता. गंभीर बाब अशी की डॉ. आंबेडकर फाउंडेशनने २०२२चे पुरस्कार जाहीर केले जाणार नाहीत, याची माहितीही आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे ही माहिती जनतेपर्यंत पोहचवताना अनेक प्रयत्न करावे लागले व खुद्ध संचालक त्रिवेदींनी खुलासा केल्याने माहिती पुढे आली.

डॉ. आंबेडकर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची प्रक्रिया प्रदीर्घ स्वरुपाची आहे. फाउंडेशनकडे नामांकने आल्यानंतर त्यांची चाळणी केली जाते. राष्ट्रपती ज्युरी सदस्यांची निवड करतात, त्यांच्या मताने एखादे नाव निश्चित केले जाते. २०२२मध्ये उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचे नाव ज्युरीचे प्रमुख म्हणून घोषित झाले होते. त्यानंतर १३ एप्रिलला नावे जाहीर करून १४ तारखेला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार दिले जातात.

गेल्या ३० वर्षांत डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार केवळ ७ जणांना तर डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन व्यक्तिंना देण्यात आला आहे.

१९९९मध्ये थोर समाजसेवक बाबा आमटे यांची डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारासाठी घोषणा झाली होती. तर २०००मध्ये डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पेनचे समाजसेवक रेमी फर्नांड क्लॉड सातोरी बॉनहोमी यांना प्रदान करण्यात आला होता.

२०१५मध्ये मोदी सरकार सत्तेत आले होते, त्यानंतर एकदाही हे दोन्ही पुरस्कार घोषित झालेले नाही. दरवर्षी या पुरस्कारांची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली जाते. यासाठी ५० लाख रु. दरवर्षी खर्च केले जातात. पण प्रशासकीय कारणामुळे हे पुरस्कार दिले जात नाहीत.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0