पीएम किसान योजनेचे १,३६४ कोटी लाटले

पीएम किसान योजनेचे १,३६४ कोटी लाटले

नवी दिल्लीः मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत (पीएम किसान) २०.४८ लाख अयोग्य लाभार्थ्यांना १,३६४ कोटी रु. वाटल्या

नोबेल पुरस्कार – मर्यादा आणि शक्यता
गैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी
तिहेरी तलाक कायदाः १ वर्षानंतर

नवी दिल्लीः मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत (पीएम किसान) २०.४८ लाख अयोग्य लाभार्थ्यांना १,३६४ कोटी रु. वाटल्याचे उघडकीस आले आहे. ही माहिती केंद्रीय कृषी खात्याला पाठवलेल्या माहिती अधिकार अर्जातून उघडकीस आली आहे.

२०१९मध्ये पीएम किसान योजना वाजतगाजत सुरू झाली होती. या योजनेंतर्गत सीमांत व दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकर्यांना वर्षातून ३ वेळा प्रत्येकी २ हजार रु. अशी ६ हजार रु.ची रक्कम दिली जाते. या योजनेत नंतर बड्या शेतकर्यांनाही सामील करून घेण्यात आले.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने या योजनेचा लाभ घेणार्या अयोग्य लाभार्थ्यांची एक यादी तयार करण्यास सुरूवात केली होती. त्यात त्यांना पीएम किसान योजनेचे निकष पूर्ण न करणारे व प्राप्तीकर भरणार्या शेतकर्यांची माहिती मिळाली. ही यादी कृषी मंत्रालयाने कॉमनवेल्थ ह्युमन राइट्स इनिशिएटिव्ह (सीएचआरआय)शी संबंधित माहिती अधिकार कार्यकर्ते वेंकटेश नायक यांच्या माहिती अधिकार अर्जाचे उत्तर म्हणून दिली.

या उत्तरात अयोग्य लाभार्थ्यांमधील किमान ५५.५८ टक्के शेतकरी  प्राप्तीकर भरणार्यातले असून ४४.४१ टक्के शेतकरी आपली अर्हता सिद्ध करू शकलेले नाहीत, असे नमूद करण्यात आले आहे.

ज्या अयोग्य लाभार्थ्यांनी पीएम किसानअंतर्गत रक्कम मिळवली आहे, त्यांच्याकडून ती वसूल करण्यात येत असल्याचेही वृत्त आहे.

जुलै २०२०पर्यंत अयोग्य लाभार्थ्यांना १,३६४ कोटी रु.चे वाटप करण्यात आले आहे. हे लाभार्थी पंजाब (४.७४ लाख लाभार्थी), आसाम (३.४५ लाख लाभार्थी), महाराष्ट्र (२.८६ लाख लाभार्थी), गुजरात (१.६४ लाख लाभार्थी) व उ. प्रदेशात (१.६४ लाख लाभार्थी) अधिक संख्येने आहेत. सिक्कीममध्ये अयोग्य लाभार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0