संजय राऊत, एकनाथ खडसेंचे सलग ६० दिवस फोन टॅप

संजय राऊत, एकनाथ खडसेंचे सलग ६० दिवस फोन टॅप

नवी दिल्लीः शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भाजपचे माजी नेते व मंत्री एकनाथ खडसे या दोघांचे फोन अनुक्रमे

सोनभद्र हत्याकांड : आदित्यनाथ सरकार कोंडीत
एसपी-डीआयजी पदांना केंद्रात प्रतिनियुक्ती सक्तीची
काश्मीर धोरणाचा पाया आरएसएसच्या संघराज्यविरोधी विचारांमध्ये

नवी दिल्लीः शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भाजपचे माजी नेते व मंत्री एकनाथ खडसे या दोघांचे फोन अनुक्रमे ६७ व ६० दिवस टॅप केले जात असल्याचे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे.

या दोन नेत्यांचे फोन २०१९मध्ये महाराष्ट्रात भाजप सरकार असताना व महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना राज्य गुप्तचर खात्याकडून (एसआयडी) टॅप करण्यात येत होते. त्यावेळी या खात्याच्या प्रमुख आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला होत्या, असे फ्री प्रेसच्या वृत्तात म्हटले आहे. संजय राऊत यांचा फोन दोन वेळा टॅप करण्यात आला होता. पहिल्यांदा त्यांचे फोन सलग ७ दिवस व नंतर सलग ६० दिवस टॅप होत होता अशी गृहखात्यातील एक अधिकाऱ्याने माहिती दिली. एसआयडीच्या फोन टॅपिंगच्या यादीत खडसे व राऊत या दोघांची नावे असल्याचेही दिसून आले आहे.

एसआयडीने या दोघांचे फोन टॅप करण्याची विनंती केली होती. एसआयडीने काँग्रेसचे नेते नाना पटोले, अपक्ष आमदार बच्चू कडू व माजी आमदार आशिष देशमुख यांचेही फोन टॅप केल्याचे फ्री प्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.

गेल्या ९ एप्रिलला राऊत व ७ एप्रिलला खडसे या दोघांचे फोन टॅपिंग संदर्भातले जबाब नोंदवण्यात आले होते.

महाविकास आघाडीतील काही महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी राज्य सरकारने तीन सदस्यांची एक समिती नेमली असून चौकशी सुरू आहे. या समितीचे अध्यक्ष सध्याचे राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे आहेत.

फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीच्या निरीक्षणात रश्मी शुक्ला यांनी नाना पटोले यांचे फोन टॅप केल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी नाना पटोले यांनी २५ फेब्रुवारीला शुक्ला यांच्याविरोधात पुण्यात ५०० कोटी रु.ची बदनामी संबंधी फिर्यादही दाखल केली आहे. या फिर्यादीवर आपले उत्तर १२ एप्रिलला द्यावे असे निर्देशही शुक्ला यांना न्यायालयाने दिले आहेत. शुक्ला यांच्याविरोधात आयपीएस अधिकारी राजीव जैन यांनीही पोलिस तक्रार केली आहे.

रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त महासंचालक असून त्या हैदराबाद येथे कार्यरत आहेत.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: