तीन वर्षांत केंद्र सरकारचा जाहिरातीवर ९११ कोटींचा खर्च

तीन वर्षांत केंद्र सरकारचा जाहिरातीवर ९११ कोटींचा खर्च

नवी दिल्लीः गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने वर्तमान पत्र, टीव्ही वाहिन्या व वेब पोर्टलवर जाहिरातींवर ९११.१७ कोटी रु. खर्च केल्याची माहिती गेल्या आठवड्

गृहमंत्र्यांच्या धमकीनंतर सब्यसाचीची जाहिरात मागे
‘आरोग्य सेतू’च्या प्रचारावर ४ कोटी १५ लाख खर्च
फेसबुकवरील जाहिरातीत भाजप आघाडीवर

नवी दिल्लीः गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने वर्तमान पत्र, टीव्ही वाहिन्या व वेब पोर्टलवर जाहिरातींवर ९११.१७ कोटी रु. खर्च केल्याची माहिती गेल्या आठवड्यात केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिली. हा कालावधी आर्थिक वर्ष २०१९-२० ते जून २०२२ असा आहे.

२०१९-२० या वर्षांत सरकारने ५,३४६ वर्तमानपत्रांमध्ये २९५.०५ कोटी रु., २०२०-२१ या वर्षांत ५,२१० वर्तमानपत्रांमध्ये १९७.४९ कोटी रु., २०२१-२२ या वर्षांत ६,२२४ वर्तमानपत्रांमध्ये १७९.०४ कोटी रु,, २०२२-२३ जूनपर्यंत १,५२९ वर्तमानपत्रांमध्ये १९.२५ कोटी रु. इतक्या रकमेच्या जाहिरात दिल्या आहेत.

सरकारने टीव्ही वाहिन्यांवर गेल्या तीन वर्षांत जाहिरातींवर किती खर्च केला आहे याचीही आकडेवारी दिली आहे. सरकारने २०१९-२० या काळात २७० टीव्ही वाहिन्यांवर ९८.६९ कोटी रु., २०२०-२१ या काळात ३१८ टीव्ही वाहिन्यांवर ६९.८१ कोटी रु, २०२१-२२ या काळात २६५ टीव्ही वाहिन्यांवर २९.३ कोटी रु., २०२२-२३ जून या काळात ९९ टीव्ही वाहिन्यांवर १.९६ कोटी रु. इतक्या रकमेच्या जाहिरातींवर खर्च केला.

सरकारने वेब पोर्टलवरही जाहिराती दिल्या आहेत. २०१९-२० या काळात ५४ वेबसाइटवर ९.३५ कोटी रु., २०२०-२१ या काळात ७२ वेबसाइटवर ७.४३ कोटी रु., २०२१-२२ या काळात १८ वेबसाइटवर १.८३ कोटी रु,, २०२२-२३ जून अखेर ३० वेबसाइटवर १.९७ कोटी रु. च्या जाहिराती सरकारने दिल्या आहेत.

गेल्या वर्षी लोकसभेत सरकारने २०१८ ते २०२१ या काळात वर्तमानपत्रे व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाहिरातींवर १६९८.८९ कोटी रु. इतका खर्च केला होता, अशी माहिती स्क्रॉल डॉट इन ने दिली आहे.

केंद्र सरकारने २०१९-२० या काळात दरदिवशी जाहिरातींवर १.९५ कोटी रु. खर्च केला होता, अशी माहिती दिली.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0