तामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई

तामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई

नवी दिल्लीः तामिळनाडूतील द्रमुक सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला २ ऑक्टोबर रोजी राज्यात ५१ ठिकाणी पदयात्रा काढण्यास मनाई केली आहे. गेल्या २२ सप्टेंब

मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गिका सुरू
अखेर संजय राठोड यांचा राजीनामा
राष्ट्रपती म्हणालेः मी ५ लाखातले ५० टक्के कर भरतो

नवी दिल्लीः तामिळनाडूतील द्रमुक सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला २ ऑक्टोबर रोजी राज्यात ५१ ठिकाणी पदयात्रा काढण्यास मनाई केली आहे. गेल्या २२ सप्टेंबरला मद्रास उच्च न्यायालयाने आरएसएसला मेळावे काढण्यास परवानगी दिली होती. पण संघाच्या या यात्रांना विरोध म्हणून आम्हीही रस्त्यावर उतरू अशी धमकी विधुथलाई चिरुथाईगल कटची व डाव्या पक्षांनी दिली होती. त्यानंतर राजकारण तापले होते. अशा अस्थिर परिस्थितीत वातावरण चिघळू नये म्हणून आरएसएसला परवानगी दिली जाणार नाही असे स्टालिन सरकारचे म्हणणे आहे. आरएसएसचे मेळावे व त्यांना विरोध करणारे मेळावे यात घातपात होऊ शकतो, असे राज्य गुप्तचर खात्याचे म्हणणे आहे. याने कायदा व सुव्यवस्थेचाही गंभीर प्रश्न उभा राहू शकतो. दोन्ही राजकीय पक्षांचे मेळावे राज्यात सर्वत्र असल्याने धार्मिक तणावही उफाळू शकतो, पीएफआयवर केंद्राने बंदी घातल्याने अनेक संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे, अशा वेळी आरएसएसला परवानगी देता येणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.

राज्यात सौहार्द व शांतता प्रस्थापित राहावी म्हणून आम्ही पदयात्रा काढत असल्याचे आरएसएसचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0