असंघटित क्षेत्राला १.५ लाख कोटी रु.चे आर्थिक पॅकेज?

असंघटित क्षेत्राला १.५ लाख कोटी रु.चे आर्थिक पॅकेज?

नवी दिल्ली – देशव्यापी लॉक डाऊनचा सर्वात मोठा फटका असंघटित क्षेत्रात काम करणार्या कोट्यवधी कामगार, मजूरांवर होणार असून अशांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे १.५ लाख कोटी रु.चे आर्थिक पॅकेज देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हे पॅकेज अजून अंतिम स्वरुपात आलेले नाही पण त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. हे पॅकेज पंतप्रधान, अर्थमंत्री व रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्या संमतीन अखेर जाहीर होईल.

एका सरकारी अधिकार्याने हे पॅकेज २.३ लाख कोटी रु.चे असेल अशीही शक्यता व्यक्त केली आहे. हे सर्व पैसे सुमारे १० कोटी गरजूंच्या थेट खात्यात जमा होतील.

लॉक डाऊनमुळे निर्माण होणार्या अर्थसंकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार २०२०-२१ या वर्षासाठी सरकारी कर्जात वाढही करू शकते. त्यासाठी सरकार रिझर्व्ह बँकेकडून ७.८ लाख कोटी रु.चा कर्ज घेण्याची शक्यता आहे. हे कर्ज घेतल्यास सरकारला रिझर्व्ह बँकेचे बॉण्ड खरेदी करावे लागतील.

COMMENTS