मरीन ड्राइव्हला भव्य मराठी भाषा भवन

मरीन ड्राइव्हला भव्य मराठी भाषा भवन

मुंबई: क्विन नेकलेस म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबईतील मरीन ड्राइव्हवर भव्य मराठी भाषा भवन उभे राहणार आहे. मंगळवारी मराठी भाषा भवन प्रकल्पाचे मुख्यमंत्र

बाबरी कटाचा अविश्वसनीय निकाल
‘जनतेसाठी पदपथ’ स्पर्धा विजेत्यांमध्ये महाराष्ट्राची ४ शहरे
जिल्हा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेहबुबा नजरकैदेत

मुंबई: क्विन नेकलेस म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबईतील मरीन ड्राइव्हवर भव्य मराठी भाषा भवन उभे राहणार आहे. मंगळवारी मराठी भाषा भवन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

मराठी भाषा विभागातर्फे “मराठी भाषा भवन मुख्य केंद्र” प्रस्तावित आहे. या इमारतीच्या बांधकाम आराखड्यासाठी स्पर्धा घेऊन वास्तूविशारदाची निवड करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेअंतर्गत वास्तूविशारदांनी सादरीकरण केले.

यावेळी चार नामांकित वास्तुविशारदांनी आपले स्वतंत्र प्रस्ताव मांडले. यामध्ये प्रदर्शन दालन सभागृह, परिषद दालने, ग्रंथालय असे विभाग दर्शविण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी शासनाने २,५०० चौ. मीटर आकाराचा भूखंड मराठी भाषा विभागाकडे हस्तांतरित केला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये बांधकामास सुरूवात करण्यात येईल तर पुढील १८ महिन्यात मराठी भाषा भवन खुले केले जाईल, अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

या साठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची निवड करण्यात आली आहे. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे व डॉ. पी. अनबलगन आदी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0