ऑक्टोबरचे जीएसटी संकलन १ लाख कोटी

ऑक्टोबरचे जीएसटी संकलन १ लाख कोटी

नवी दिल्लीः गेल्या ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनाचा आकडा १.०५ लाख कोटी रु.पर्यंत पोहचला आहे. फेब्रुवारी महिन्यात जीएसटीचे संकलन १ लाख कोटी रु.चे झाले होते

वस्त्रोद्योग उत्पादनावरचा जीएसटी ५ टक्केच
जीएसटीचे संकलन अंदाजापेक्षा ४०% ने कमी
जीएसटी फसला – उद्धव ठाकरे

नवी दिल्लीः गेल्या ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनाचा आकडा १.०५ लाख कोटी रु.पर्यंत पोहचला आहे. फेब्रुवारी महिन्यात जीएसटीचे संकलन १ लाख कोटी रु.चे झाले होते, त्यानंतर पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये १ लाख कोटी रु.चा आकडा पार करण्यात आला आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत ८० लाख रु. एवढ्या रकमेचा जीएसटीआर-3बी रिटर्न जमा करण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिन्यातील एकूण जीएसटी संकलन १,०५,१५५ कोटी रु.तील १९,१९३ कोटी रु. हे सीजीएसटी, ५,४११ कोटी रु. एसजीएसटी, ५२,५४० कोटी रु. आयजीएसटी व अधिभार ८,०११ कोटी रु. इतका जमा झाला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जीएसटीचे संकलन ९५,३७९ कोटी रु. झाले होते. त्यापेक्षा यंदाचे ऑक्टोबर महिन्यातील जीएसटी संकलन १० टक्क्यांनी अधिक आहे.

लॉकडाऊन पुकारल्यानंतर १ लाख कोटी रु. जीएसटी संकलन घसरले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: