ट्रम्प अहमदाबाद भेट : ४५ कुटुंबांना झोपड्या खाली करण्याचे आदेश

ट्रम्प अहमदाबाद भेट : ४५ कुटुंबांना झोपड्या खाली करण्याचे आदेश

नवी दिल्ली : अहमदाबाद शहरातील नवनिर्मित मोटेरा स्टेडियमपासून दीड किमी अंतरावरील एका झोपडपट्‌टीतील ४५ कुटुंबाना येत्या सात दिवसांत झोपड्या खाली करण्याच

अहमदाबाद व नरेंद्र मोदी – प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न
२५ वर्षे समाजासाठी खस्ता, मते फक्त १,२२४ मते?
खेळपट्टी की आखाडा

नवी दिल्ली : अहमदाबाद शहरातील नवनिर्मित मोटेरा स्टेडियमपासून दीड किमी अंतरावरील एका झोपडपट्‌टीतील ४५ कुटुंबाना येत्या सात दिवसांत झोपड्या खाली करण्याचे आदेश अहमदाबाद महानगरपालिकेने सोमवारी दिले आहेत. या आदेशावरची तारीख ११ फेब्रुवारीची आहे.

महापालिकेचे हे आदेश ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीशी जोडण्यात येत आहेत. कारण येत्या २४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादेत चार तासांसाठी येत असून त्यांच्या नजरेस अहमदाबादेतील सरनियावास झोपडपट्‌टी दिसू नये म्हणून एक भिंत बांधली गेली आहे. सध्या या भिंतीवर रंगरंगोटीही झाली आहे. भिंत बांधण्याच्या या निर्णयावर चोहोबाजूंनी टीकाही झाली होती. आता मोटेरा स्टेडियममध्ये ट्रम्प व मोदी यांचा ‘केम छो ट्रम्प’ हा कार्यक्रम होत असल्याने तेथील साफसफाई सुरू असल्याने तेथील झोपड्या खाली करण्याचे आदेश ४५ कुटुंबाना दिले आहेत.

मोटेरा स्टेडियमपासून सुमारे दीड किमी अंतरावरील या झोपड्या २० वर्षापासून आहेत. हा रस्ता मोटेरा स्टेडियमकडे जाणारा आहे. सध्या या झोपडपट्‌टीत बांधकाम मजूर राहत असून त्यांच्याकडे परवानाही आहे. या झोपड्यात राहणाऱ्यांचे दरदिवशीची कमाई ३०० रु. आहे. सोमवारी त्यांच्या घरात महापालिकेचे अधिकारी आले व त्यांनी ४५ कुटुंबांना लगेच जागा खाली करण्यास सांगितले.

या झोपडपट्‌टीत राहणारा एक मजूर तेजा मेडाने सांगितले की, ट्रम्प-मोदी यांचा मोटेरा स्टेडियममध्ये कार्यक्रम असून येथील जागा लवकरात लवकर खाली केली पाहिजे, असे आम्हाला पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण अहमदाबाद महापालिकेने या नोटीसीचा ट्रम्प यांच्या दौऱ्याशी काही संबंध नाही असे स्पष्ट केले आहे. उलट ही जागा सरकारी असून त्यावर अतिक्रमण झालेले आहे. या जागेवर लवकरच शहर विकास योजनेंतर्गत कामे सुरू होणार असल्याने झोपडपट्‌टीधारकांना जागा खाली करण्यासाठी नोटीसी दिल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: