कोरोनावर गुजरात सरकारकडून होमिओपॅथी औषधांचे वाटप

कोरोनावर गुजरात सरकारकडून होमिओपॅथी औषधांचे वाटप

अहमदाबादः कोरोनावर रोगप्रतिकार औषध म्हणून गुजरात सरकारने जवळपास अर्ध्या राज्यात अर्सेनिकम अल्बम-30 हे होमिओपथी औषधाचे वाटप केल्याचे राज्य सरकारच्या आर

जगात कोरोनाचे ६ कोटीहून अधिक रुग्ण
आपत्तीची विविध रंगरूपे आणि करोना
कोरोनाचे औषध नव्हे, केवळ बनवाबनवी!

अहमदाबादः कोरोनावर रोगप्रतिकार औषध म्हणून गुजरात सरकारने जवळपास अर्ध्या राज्यात अर्सेनिकम अल्बम-30 हे होमिओपथी औषधाचे वाटप केल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने सांगितले आहे.

२० ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य संघटनेपुढे केलेल्या सादरीकरणात राज्य सरकारने कोविड-१९ ला रोखण्यासाठी राज्यात सुमारे ३ कोटी ४० लाख नागरिकांना होमिओपथी औषध उपचार म्हणून अर्सेनिकम अल्बम-30च्या गोळ्या वाटल्याची कबुली दिली.

कोरोनावर अद्याप जगभरात कोणतेही औषध विकसित झालेले नाही. आणि आधुनिक वैद्यक शास्त्र व होमिओपथी औषध उपचार करणार्या काही डॉक्टरांनीही अर्सेनिकम अल्बम-30च्या गोळ्या कोरोनावर परिणामकारक ठरतात असे म्हटलेले नाही. तरीही गुजरात सरकारने अर्सेनिकम अल्बम-30च्या गोळ्या वाटपावर भर दिला आहे.

सरकारने असा दावाही केला आहे की, राज्यातल्या ज्या नागरिकांनी आयुषने (आयुर्वेद, योग, नॅचरोपथी, युनानी, सिद्ध व होमिओपथी) सांगितलेले उपचार केले, त्यातील ९९.६ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. तर उरलेल्या ०.३ टक्के रुग्णांवर अर्सेनिकम अल्बम-30 गोळ्यांचा प्रभाव पडल्याचा सरकारचे म्हणणे आहे. या रुग्णांमध्ये कोरोनाची फारशी लक्षणे दिसून आलेली नाहीत, असेही सांगितले गेले.

पण राज्यात अर्सेनिकम अल्बम-30 औषध घेत असलेल्या कोरोना रुग्णांची क्लिनिकल चाचणी घेतली त्यात कोणताही निकाल हाती लागला नाही, असेही सरकारने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेपुढील सादरीकरणात गुजरात सरकारने आयुष उपचार घेतल्यामुळे ३३,२६८ कोरोना रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचे सांगितले. त्यामधील अर्ध्या रुग्णांनी होमिओपथीचे औषध घेतले होते, अशीही पुष्टी दिली आहे.

आयुषचे वेगळे म्हणणे

दरम्यान आयुष खात्याच्या राज्याच्या संचालक भावना पटेल यांनी अर्सेनिकम अल्बम-30 या गोळ्यांच्या क्लिनिकल चाचण्यांमधून फारसे काही निष्पन्न झाले नसल्याचे सांगितले. आयुष मंत्रालयाने या गोळ्यांचे वाटप करण्याचा निर्णय होमिओपथीतील तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतला होता. या मंत्रालयाने राज्यात २७३ दवाखान्यांच्या माध्यमातून या गोळ्यांचे वितरण केले. काही ठिकाणी एनजीओंच्या मदतीने आरोग्य शिबिरे सुरू केली. हे औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पण त्यावरचे संशोधन मात्र अद्याप अपूर्ण असल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे. भावनगरमधल्या खासगी रुग्णांलयांना अर्सेनिकम अल्बम-30च्या क्लिनिक ट्रायलची परवानगी देण्यात आली होती पण त्यांचे निष्कर्ष अजून संदिग्ध आहेत. कारण त्यांचे संशोधन अपूर्ण आहेत, असे पटेल म्हणाल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: