गुजरात : गोशाळेत कोविड सेंटर; गोमूत्राचा उपचार

गुजरात : गोशाळेत कोविड सेंटर; गोमूत्राचा उपचार

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरात राज्यात कोविड-१९ विरोधात उपचार म्हणून भलतेच उपचार केले जात आहे. राज्या

गो परिक्षेच्या अभ्यासक्रमात अशास्त्रीय दाव्यांचा सुळसुळाट
भाजप नेत्याच्या गोशाळेत शेकडो गायी मृत
१५ वर्षांत मध्य प्रदेशात एकही गोशाळा नाही

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरात राज्यात कोविड-१९ विरोधात उपचार म्हणून भलतेच उपचार केले जात आहे. राज्यातल्या बनासकंठा जिल्ह्यातील टेटोडा गावांत एका गोशाळेत कोविड केअर सेंटर सुरू केले असून तेथे दाखल झालेल्या कोरोना रुग्णांवर गोमूत्रापासून बनवलेले गेलेले औषध आयुर्वेद औषध म्हणून वापरले जात आहे. या कोविड सेंटरचे नाव ‘वेदालक्षणा पंचगव्य आयुर्वेद कोविड आयसोलेशन सेंटर’ असे ठेवण्यात आले आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या तथाकथित कोविड सेंटरमध्ये सध्या ७ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. या संदर्भात गोधाम महातीर्थ पथमेडा बनासकंठा विंगचे ट्रस्टी मोहन जाधव यांनी माहिती दिली की, हे कोविड सेंटर ५ मे पासून सुरू झाले असून तेथे कोरोनाची कमी लक्षणे दिसणारे ७ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. या रुग्णांना गायीचे दूध, तूप, मूत्रापासून बनवली गेलेली औषधे देण्यात येत आहेत. हे उपचार आयुर्वेदिक असल्याचे सांगितले जात आहे.

या औषधांव्यतिरिक्त या कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना पंचगव्य आयुर्वेदिक पद्धतीचेही उपचार केले जात आहे. यात गायीचे मूत्र व काही वनस्पतींची मुळं, खोडं,पानं एकत्रित करून ‘गो तीर्थ’ दिले जात आहे. या उपचारामुळे रुग्णांचा खोकला बरा होतो असा दावा जाधव यांचा आहे. रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून गायीच्या दुधापासून बनवले गेलेले च्यवनप्राशही दिले जाते.

सध्या या सेंटरमध्ये दोन आयुर्वेदिक डॉक्टर व दोन एमबीबीएस डॉक्टर असून हे डॉक्टर अलोपॅथीची औषधेही रुग्णांना देत आहेत.

गुजरात सरकारने अशी कोविड सेंटर स्थापन करण्यास परवानगी दिली आहे.

राज्यात सध्या सव्वा लाख बेडची १०,३२० कोविड सेंटर असून तेथे रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जात आहेत.

या संदर्भात बनासकंठाचे जिल्हाधिकारी आनंद पटेल यांनी सांगितले की, कोविड केअर सेंटर तयार करण्यासाठी मंजुरीची आवश्यकता नाही. पण आमच्याकडे टेटोडा गावातून विनंती आल्याने आम्ही त्याला होकार दिला आहे.

दरम्यान कोविड-१९ रुग्ण गोमूत्र प्याल्याने बरे होतात असा कोणताही वैद्यकीय निष्कर्ष अद्याप जगाला मिळालेला नाही. अनेक डॉक्टर व वैज्ञानिकांनी गोमूत्र उपचाराला कडाडून विरोध केला आहे. अशी कोणतीही औषधे कोविड रुग्णाला देऊ नये असे हे वैद्यकीय जगत सांगत आहे.

मूळ बातमी

(छायाचित्र – प्रतिकात्मक )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0