टीका करून मृत रुग्ण बरे होणार नाहीत : गुजरात हायकोर्ट

टीका करून मृत रुग्ण बरे होणार नाहीत : गुजरात हायकोर्ट

नवी दिल्ली : कोरोना हे राजकीय संकट नसून ते मानवीय संकट आहे, या काळात सरकारवर टीका केल्याने चमत्कार होऊन रुग्ण लगेच बरे होतील किंवा मेलेला रुग्ण जिवंत

बशीरची ११ वर्षानंतर निर्दोष सुटका
‘बिल्कीस बानोंना २ आठवड्यात आर्थिक मदत द्या’
गुजरातमध्ये कोविड मृतांबाबत लपवाछपवी

नवी दिल्ली : कोरोना हे राजकीय संकट नसून ते मानवीय संकट आहे, या काळात सरकारवर टीका केल्याने चमत्कार होऊन रुग्ण लगेच बरे होतील किंवा मेलेला रुग्ण जिवंत होईल असे समजू नये, असे मत गुजरातच्या उच्च न्यायालयाने व्यक्त केले. या संकटाच्या काळात सरकारला सहकार्य करून रचनात्मक टीका करावी असाही सल्ला मुख्य न्यायमूर्ती विक्रम नाथ व न्या. जेबी पर्दीवाला यांच्या पीठाने दिला.

कोरोना महासंकटावरील एका याचिकेवर न्यायालयाने टीकाकारांना सबुरीचा सल्ला देत विचारपूर्वक टीका करावी असे सांगितले. काही दिवसांपूर्वी कोरोना महासंकटावरून गुजरात सरकारच्या कामावर सोशल मीडिया व अन्य ठिकाणी अनावश्यक चर्चा व टीकाटिपण्या सुरू झाल्या होत्या, त्यातून गैरसमज पसरवले जात होते. पण कोविड -१९ हे राजकीय नव्हे तर मानवीय संकट आहे. त्यामुळे या संकटात राजकारण करू नये असे न्यायालयाने म्हटले.

न्यायालयाने सरकारवर टीका करणार्या विरोधी पक्षांनाही सल्ला दिला. या काळात विरोधकांनी टीकेत मश्गुल राहण्यापेक्षा सरकारला मदतीचा हात देण्याची गरज असून अशा काळात सरकारच्या प्रयत्नांमधील कमतरता दाखवणे व त्यांच्याशी मतभेद दाखवल्यास जनतेमध्ये भय पसरले जाते, असेही न्यायालयाने म्हटले.

न्यायालयाच्या भूमिकेत बदल

२२ मे रोजी न्या. जेबी पर्दीवाला व न्या. इलेश जी वोरा यांच्या पीठाने याच याचिकेवर आपले मत व्यक्त करताना अहमदाबादमधील सिव्हील हॉस्पिटलची स्थिती दयनीय असून ते अंधार कोठडीहून भयंकर असल्याचे म्हटले होते.

याच हॉस्पिटलमध्ये ४१५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली होती.

याच पीठाने सरकारला व्यवस्थित काम करण्याचे आदेशही दिले होते. पण नंतर  हे प्रकरण हाताळणार्या न्यायमूर्तींचे पीठच बदलले आणि हे प्रकरण मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखाली पीठाला दिले. या पीठात असलेले न्या. पर्दीवाला हे कनिष्ठ आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: