नवी दिल्लीः बिल्कीस बानोच्या अधिकाराच्या समर्थनार्थ आणि तिला न्याय मिळावा या मागणीसाठी पदयात्रा काढणाऱ्या ७ जणांना गुजरात पोलिसांनी २५ सप्टेंबरला ताब्
नवी दिल्लीः बिल्कीस बानोच्या अधिकाराच्या समर्थनार्थ आणि तिला न्याय मिळावा या मागणीसाठी पदयात्रा काढणाऱ्या ७ जणांना गुजरात पोलिसांनी २५ सप्टेंबरला ताब्यात घेतले होते पण या ७ जणांपैकी काहींची सुटका नंतर करण्यात आली. या ७ जणांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे संदीप पांडे, नूरजहाँ दिवान, तनुश्री, नितेश गंगारमान, कौशर अली, टी. गोपाल कृष्ण व हनीफ कलंदार यांचा समावेश आहे. या ७ जणांना गुजरातमधील पंचमहाल जिल्हा पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतले.
या ७ जणांमधील सामाजिक कार्यकर्ते हनीफ कलंदर यांना गोधरा येथून त्यांच्या घरातून ताब्यात घेतले, पण त्यांची आणि नूरजहाँ व तनुश्री यांची नंतर सुटका करण्यात आली. तर संदीप पांडे यांना काकनपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. पांडे यांनी या पोलिस कारवाईविरोधात उपोषण सुरू केल्यानंतर त्यांना मंगळवारी दुपारी सोडण्यात आल्याची माहिती द वायरला कौशर अली यांनी दिली.
अन्य कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत.
या ७ जणांनी २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर अशी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात दंगलपीडित बिल्कीस बानोवर अन्याय झाला असून तिला न्याय मिळावा अशी या कार्यकर्त्यांची मागणी होती. ही पदयात्रा दाहोद येथील रंधिकपूर येथून निघणार होती. या पदयात्रेचे आयोजन अहमदाबादेतील हिंदू-मुस्लिम एकता समितीने केले होते.
मूळ वृत्त
COMMENTS