विना मास्क दंडः गुजरातची २५२ कोटी रु.ची वसूली

विना मास्क दंडः गुजरातची २५२ कोटी रु.ची वसूली

नवी दिल्लीः कोविड-१९ महासाथीच्या २० जून २०२० ते २८ जून २०२१ या काळात गुजरात पोलिसांनी राज्यात मास्क न घालणार्या ३४ लाख ७२ हजार नागरिकांकडून तब्बल २५२

कोविड मृत्यूंची अचूक आकडेवारी प्राप्त करण्याचे उपाय
राज्यात ब्रिटनमधून आलेल्या नव्या कोरोनाचे ८ रुग्ण
देशात एकाच दिवशी ३८६ कोरोना रुग्ण आढळले

नवी दिल्लीः कोविड-१९ महासाथीच्या २० जून २०२० ते २८ जून २०२१ या काळात गुजरात पोलिसांनी राज्यात मास्क न घालणार्या ३४ लाख ७२ हजार नागरिकांकडून तब्बल २५२ कोटी रु.चा दंड वसूल केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अहमदाबाद पोलिसांनी मास्क न घालणार्या ६ लाख ६३ हजार व्यक्तींकडून ५३ कोटी २१ लाख रु.चा दंड वसूल केला आहे. हा आकडा राज्यातला सर्वाधिक आहे. अहमदाबाद पाठोपाठ राजकोट पोलिसांनी २५ कोटी १२ लाख रु.चा दंड मास्क न घालणार्यांकडून वसूल केला आहे.

गुजरात सरकारने ही माहिती गुरुवारी गुजरात उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केली आहे. गुजरातमधील डांग जिल्ह्यात मास्क न घालणार्या ६,३५० व्यक्तींकडून सर्वात कमी दंड ४९ लाख रु. वसूल केला आहे.

पण गुजरात पोलिसांनी २५ मार्च २०२० ते २८ जून २०२१ या काळात सुमारे ५७ लाख ४५ हजार मास्क नियमाचा भंग करणार्यांना वाटप केले आहेत.

गुजरात पोलिसांनी विना मास्क व्यतिरिक्त संचारबंदीचा भंग करणार्यांकडून १ कोटी रु.चा दंड वसूल केला आहे. राज्य सरकारने या दंडांव्यतिरिक्त सोशल डिस्टन्सिंग संदर्भातले नियम धुडकावण्यासंदर्भात वर्षभरात ५ लाख १३ लाख केस नोंद केल्या आहेत.

दुसरीकडे गेल्या एप्रिल महिन्यात उ. प्रदेशात ३५ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. या काळात पोलिसांनी विना मास्क वावरणार्या ३१,३२५ व्यक्तिंकडून ६४ लाख १६ हजार रु. दंड वसूल केला आहे. सरकारने विना मास्क असणार्यांवरच्या दंडात वाढ केली असून ती पहिल्या गुन्ह्यासाठी १ हजार रु. तर दुसर्यांदा हाच गुन्हा केला तर १० हजार रु. दंड ठेवला आहे.

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत विना मास्क वावरणार्या २६ लाख ८७ हजार व्यक्तींकडून सुमारे ५४ कोटी रु.चा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.

बंगळुरुत मे २०२० ते ७ फेब्रुवारी २०२१ या काळात कोविड नियमांचा भंग करणार्या ३ लाख ७० केस नोंद झाल्या असून त्यांच्याकडून ८ कोटी ७६ लाख रु. दंड वसूल केला गेला आहे.

न्यूज१८ने दिलेल्या वृत्तानुसार ३ महानगरे व २ राज्यांतून वर्षभरात कोविड निर्बंधासंबंधित विविध नियमांचा भंग केल्या प्रकरणी ३६८ कोटी रु. दंड वसूल झाला आहे. ही रक्कम भारत अफगाणिस्तानला देत असलेल्या मदतीपेक्षा अधिक आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: