काबूलमध्ये बॉम्बस्फोट २५ शीख भाविक ठार

काबूलमध्ये बॉम्बस्फोट २५ शीख भाविक ठार

काबूल  - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी सकाळी एका शीख धर्मियांच्या प्रार्थनास्थळात काही अज्ञात माथेफिरूंनी केलेल्या गोळीबारात व आत्मघाती हल्

भूमी कोणालाही वापरू देणार नाहीः तालिबान
गुंतागुंतीचा बलुचिस्तान
उद्दाम माणूस आणि नव्या व्यवस्थेची गरज

काबूल  – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी सकाळी एका शीख धर्मियांच्या प्रार्थनास्थळात काही अज्ञात माथेफिरूंनी केलेल्या गोळीबारात व आत्मघाती हल्ल्यात २५ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. हा आकडा वाढण्याचीही भीती आहे. तर या प्रार्थना स्थळात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी सर्व माथेफिरुंना ठार मारले असून ८० हून अधिक भाविकांची सुटका केली आहे.

अफगाणिस्तानातील तालिबान व विविध टोळ्यांमध्ये शांतता करारावर एकमत होत नसल्या कारणाने मंगळवारी अमेरिकेने अफगाणिस्तानला देण्यात येणारी १ अब्ज डॉलरची मदत रोखण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर लगेचच हा हल्ला घडवून आणण्यात आला.

या हल्ल्याचा निषेध भारत, अमेरिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने केला असून अफगाण सैनिकांनी नाटोच्या मदतीने हल्लेखोरांना ठार केल्याचे नाटोकडून सांगितले जात आहे.

हा हल्ला होण्याअगोदर काबूलमधील शीख प्रार्थनास्थळात सुमारे २०० हून अधिक भाविक जमा झाले होते. या दरम्यान तीन आत्मघाती हल्लेखोर प्रार्थनास्थळात घुसले व त्यांच्या बरोबर काही बंदूकधार्यांनी स्वैर गोळीबार केला.

अफगाणिस्तानात ३०० हून अधिक शीख कुटुंबे राहात असून तेथे शीख समुदाय हा अल्पसंख्याक समजला जातो.

१९८०च्या दशकाअखेर तालिबान दहशतवादामुळे ५० हजारहून अधिक शीख नागरिक आपल्या कुटुंबांसह अफगाणिस्तानाच्या अनेक भागात आसरा घेतला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: