हर्ष मंदेर यांच्या अनुपस्थितीत घर, कार्यालयावर ‘ईडी’चे छापे

हर्ष मंदेर यांच्या अनुपस्थितीत घर, कार्यालयावर ‘ईडी’चे छापे

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरूवारी नवी दिल्लीत सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आणि मानवी हक्क अधिकार कार्यकर्ते हर्ष मंदेर यांच्या घर व कार्यालयावर आणि

वायएसआर नेत्यांची न्यायाधीशांवर टीका; सीबीआयकडे तपास
सुशांत सिंगची आत्महत्याच: एम्सचा अहवाल
भाजपा≠ कॉन्ग्रेस (BJP is NOT equal to Congress!)

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरूवारी नवी दिल्लीत सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आणि मानवी हक्क अधिकार कार्यकर्ते हर्ष मंदेर यांच्या घर व कार्यालयावर आणि त्यांची संस्था चालवत असलेल्या बाल गृहावर छापे टाकले. हर्ष मंदेर हे पत्नीसह जर्मनीला रवाना झाल्याच्या काही तासानंतर त्यांच्या अनुपस्थितीत ही छापेमारी करण्यात आली.

ही छापेमारी आज सकाळी आठ वाजता वसंत कुंज येथील मंदेर यांच्या निवासस्थानी आणि अधचिनीमधील सेंटर फॉर इक्विटी स्टडीज (सीईसी)च्या कार्यालयावर करण्यात आली. तसेच ईडीने महरौलीमध्ये एका बाल गृहावर देखील छापा मारला. हे बालगृह स्थापन करण्यासाठी सेंटर फॉर इक्विटी स्टडीज (सीईसी)णे पुढाकार घेतला आहे.

‘द वायर’ला मिळालेल्या माहितीनुसार ईडीचे किमान सात अधिकारी अधचिनी येथील सीईएस कार्यालयात उपस्थित होते. राज्यशास्त्रज्ञ झोया हसन, कार्यकर्ते बेजवडा विल्सन, दिवंगत अधिकारी केशव देसीराजू आणि अर्थतज्ज्ञ दीपा सिन्हा हे सीईएसचे बोर्ड सदस्य आहेत

ईडी काय शोधत आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्रखर  टीकाकार असलेल्या मंदेर यांना आत्ता पर्यंत प्रशासकीय तपासणीला वारंवार सामोरे जावे लागले आहे. मात्र कोणत्याही एजन्सीला त्यांच्याविरुद्ध आरोप सिद्ध करता आलेले नाहीत.

सीईएसने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हंटले आहे, “हे मानवी हक्कांबाबत स्पष्ट भूमिका घेत असल्याबद्दल सीईएस आणि हर्ष मंदेर यांचा छळ करण्याचा प्रयत्नांचा एक भाग आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून, या संस्थेवर दिल्ली पोलीस, आणि एनसीपीसीआरसह विविध सरकारी यंत्रणांकडून छापे, तपास आणि चौकशी केली जात आहे. सीईएसने प्रत्येक सरकारी एजन्सीला सहकार्य केले आहे. एजन्सींकडून विनंती करण्यात आल्यानुसार सर्व संस्थात्मक तपशील, ताळेबंद आणि इतर आर्थिक आणि इतर कागदपत्रे पुरविण्यात आली आहेत. संस्थात्मक कागदपत्रे आणि नोंदींचा संपूर्ण संच एकापेक्षा जास्त वेळा सरकारी संस्थांना सादर करण्यात आला आहे. ”

गुरुवारी ईडीने छापे घातलेल्या विविध ठिकाणांमध्ये ‘उम्मीद अमन घर’ नावाचे एक बाल गृह आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ऑक्टोबर २०२० मध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये आर्थिक आणि प्रशासकीय अशा अनेक अनियमितता सापडल्याचा दावा केला होता. तेव्हा हे बाल गृह वादात सापडले होते. एनसीपीसीआरने बाल गृहाच्या विरोधात एफआयआर दाखल केला. यावर्षी जुलै महिन्यात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने(एनसीपीसीआर) दिल्ली उच्च न्यायालयाता सांगितले होते, की मंदेर यांच्याशी निगडित असलेल्या दोन बाल गृहांच्या विरोधात विविध बाबींचे उल्लंघन आणि विसंगती आढळल्यानंतर कारवाईच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

मात्र दिल्ली बाल हक्क संरक्षण आयोगाने केलेल्या चार वेगवेगळ्या सर्वेक्षणांच्या आधारे न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यामध्ये ‘एनसीपीसीआर’ने केलेल्या दाव्यांच्या विरोधात आपले मत दिले आहे.

केंद्र सरकार राजकीय सूडापोटी बालगुहांवर कारवाई करत असल्याच्या मंदेर यांच्या दाव्याला दिल्ली बाल हक्क संरक्षण आयोगाच्या प्रतिज्ञापत्राने पुष्टी मिळाली आहे.

‘एनसीपीसीआर’ने अशा वेळी बाल गृहांवर छापे टाकले होते, जेव्हा मंदेर सी ए ए आणि एन आर सी कायद्याच्या विरोधात नेतृत्त्व करण्यासाठी पुढे आले होते.

एनसीपीसीआरने न्यायालयाला दिलेल्या जबाबात नमूद केलेल्या उल्लंघनांपैकी एक म्हणजे त्यांना मुलांनी जंतर -मंतरसह निषेध स्थळांवर नेण्यात आल्याची माहिती दिली.

गुरूवारी पहाटे मंदेर हे जर्मनीला बर्लिनमध्ये रॉबर्ट बॉश अकादमी येथे फेलेशिपसाठी पत्नीसह रवाना झाले.

छापा पडल्याचे समजताच कार्यकर्त्या कविता कृष्णन या मंदेर यांना पाठींबा देण्यासाठी गुरुवारी सकाळी त्यांच्या घरी गेल्या होत्या. मात्र या क्षणी कोणालाही घरात जाण्याची परवानगी नाही, असे मंदेर यांची मुलगी सुरूर मंदेर यांनी कृष्णन यांना सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0