डॉ. सिंग यांना उत्तर म्हणून हर्षवर्धन काँग्रेसवर बरसले

डॉ. सिंग यांना उत्तर म्हणून हर्षवर्धन काँग्रेसवर बरसले

नवी दिल्लीः देशातल्या कोरोना महासाथीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच सूचना करणारे विनंतीवजा पत्र माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्य

कोरोनाः मजुरांच्या जप्त सायकली विकून २३ लाख कमावले
टोक्यो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलले
कोरोनाच्या संकटाला आपण सर्वच जबाबदारः मोहन भागवत

नवी दिल्लीः देशातल्या कोरोना महासाथीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच सूचना करणारे विनंतीवजा पत्र माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी रविवारी पाठवले होते. या पत्रावरची केंद्र सरकारची प्रतिक्रिया सोमवारी तीव्र स्वरुपाची आली.

पंतप्रधानांऐवजी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी या पत्राला उत्तर देताना काँग्रेसने लसीकरणावर शंका घेतल्याने देशात कोरोनाची दुसरी लाट उसळल्याचा आरोप केला. डॉ. सिंग यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात हर्ष वर्धन म्हणाले, डॉ. सिंग सांगण्यास दुःख होतेय की कोरोनाविरोधातील लढाईमध्ये लसीकरण कार्यक्रम महत्त्वाचा आहे हे आपणाला माहीतच आहे पण आपला पक्ष व ज्या राज्यात आपल्या पक्षाचे सरकार आहे, तेथील महत्त्वाच्या पदावर बसलेले लोक आपल्या भूमिकेशी सहमत नाहीत. भारताने दोन लसी विकसित केल्या आहेत, याचा अभिमान देशासाठी महत्त्वाचा नाही का? आपला अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीत व रचनात्मक मदतीसाठी असलेला सल्ला आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी मानला तर इतिहास तुमच्याप्रती आदर दाखवेल. तुमची देशाप्रती असलेली चिंता आम्हाला लक्षात येते. तुमच्यासारखेच आमचे मत आहे. कोविड विरोधात लढण्यासाठी तुमची मदत आम्हाला मिळेलच यात शंका नाही. भविष्यात तुमचे सल्ले आम्हाला मिळत जातील पण काँग्रेस पक्षाचे आपण वरिष्ठ नेते असल्याने तुमचे सल्ला तुमच्या नेत्यांना मिळतील अशी आशा आहे. असे हर्षवर्धन म्हणाले.

मूळ बातमी

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0