खट्‌टरांची थाप; सगोत्र लग्नांवरील बंदीला विज्ञानाचा आधार नाही

खट्‌टरांची थाप; सगोत्र लग्नांवरील बंदीला विज्ञानाचा आधार नाही

सगोत्र विवाहांवर सरसकट बंदी घालणे किंवा जोडप्यांना मारूनच टाकणे हे निर्दयी उपाय करण्यापेक्षा विज्ञान समजून घेऊन विवाहपूर्व समुपदेशन आणि मूल जन्माला घालण्यापूर्वीचे जनुकीय समुपदेशन हे केले जाण्याची गरज आहे.

सरदार पटेल स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव
भाजपच्या मेगा मॉलमध्ये मेगा भरती
अधीर रंजन चौधरींनी मागितली राष्ट्रपतींची माफी

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या म्हणण्यानुसार एकाच गोत्रातील मुलामुलींच्या विवाहाला खाप पंचायती जो विरोध करतात त्याला शास्त्रीय आधार आहे.

उत्तर भारतामधील खेडेगावांमध्ये अनेक जातीसमुदायांचे नेतृत्व त्या त्या जातींच्या खाप पंचायती करतात. या खापपंचायती एकाच गोत्रातील विवाहांना कट्टर विरोध करतात आणि अनेकदा असे विवाह करणाऱ्यांच्या विरोधात हिंसेचाही मार्ग अवलंबतात.

एकाच गोत्रातील लोक हे एकाच मूळ पुरुषाचे वंशज असतात असे मानले जाते. किंवा काहीजण याची व्याख्या एक गोत्र म्हणजे हिंदू परंपरेतील सात ऋषींपैकी एकाला मानणारे अशीही करतात. त्यामुळे त्यांच्या मते हे लोक रक्ताच्या नात्याने जोडलेले नसतात तर तात्विकदृष्ट्या एक परंपरा मानणाऱ्यांचे वंशज असतात.

काहीही असले तरी, एकाच गोत्रातील लोकांमध्ये विवाह निषिद्ध मानलेला आहे. सगोत्र विवाह कौटुंबिक व्यभिचारासमान मानला आहे. (पण जातीत विवाह करणे हे सक्तीचे आहे). मात्र या बंदीला कोणत्याही ग्रंथात आधार नाही आणि त्यामुळे हिंदू परंपरांनुसार तयार झालेल्या कायद्यांमध्येही तिला मान्यता नाही.

एक पंचायत समर्थक नरेश काड्यान यांनी २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अशी याचिका दाखल केली होती की हिंदू विवाह कायदा, १९५५ मध्ये बदल करून सगोत्र विवाहांना बंदी करावी. न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिल्ली उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्या वेळच्या द हिंदूच्या बातमीमध्ये लिहिले आहे:

… जेव्हा खंडपीठाने [काड्यान यांना] सगोत्र विवाहांना बंदी घालणारे हिंदू धर्मग्रंथातील वचन उद्धृत करण्यास सांगितले तेव्हा याचिकाकर्त्यांना ते करता आले नाही. याचिकाकर्ता न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया घालवत आहे हे पाहून खंडपीठाने टिप्पणी केली, की याचिकाकर्त्याला त्याच्या दाव्याला आधार देता येत नसेल तर त्यांनी न्यायालयात दावा दाखल करायला नको होता.

सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितले आहे की दोन व्यक्तींना विवाह करायचा असेल, तर त्या दोन्हीही परस्परसंमती असलेल्या प्रौढ व्यक्ती असणे एवढेच आवश्यक आहे.

खाप पंचायतीच्या भूमिकेमागे विज्ञान आहे हा खट्टर यांचा दावाही असाच चुकीचा आहे. कारण एक तर विवाह ही एक सामाजिक-सांस्कृतिक संस्था आहे जी वैज्ञानिक तत्त्वांमधून उभी राहत नाही. आणि ही वैज्ञानिक तत्त्वे शरीरसंबंधांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत.दोन व्यक्तींना मूल जन्माला घालण्याच्या हेतूने लैंगिक संबंध प्रस्थापित करायचे असतील तर तिथे विज्ञानाचा भाग येतो.

Degree of consanguinity किंवा समरक्तता स्तर म्हणजेच कितव्या पिढीपर्यंत दोन व्यक्तींमध्ये रक्ताचे नाते आहे ही संख्या दोन लोकांमधल्या नातेसंबंधांबाबत वापरली जाते. म्हणजे दोन व्यक्तींचा सर्वात अलिकडचा समान पूर्वज कितव्या पिढीमध्ये येतो ती संख्या.

बरेचदा ही संख्या ४ किंवा कमी असेल तर त्यांच्यामध्ये विवाहाला परवानगी नसते. स्तर ४ म्हणजे दोन व्यक्तींमध्ये पूर्वजांच्या ४ थ्या पिढीमध्ये एक समान पूर्वज आहे, मात्र त्यानंतर नाही. स्तर १० म्हणजे नऊ पिढ्यांपूर्वीच्या पिढीत समान पूर्वज आहे, मात्र त्यानंतर नाही.

जनुकीय दृष्टिकोनातून समरक्तता असेल तर विवाह करणे तितकेसे योग्य नाही कारण जवळचे पूर्वज समान असलेल्या व्यक्तींच्या मुलांमध्ये अपायकारक जनुके येण्याची शक्यता जास्त असते तसेच जनुकीय वैविध्य कमी असल्यामुळे जैविक धोक्यांचा सामना करण्याची क्षमताही कमी असू शकते. (ज्याला founder effect म्हणतात).

मात्र समरक्तता स्तर ६ किंवा कमी असेल तर दोन व्यक्तींमधील संबंध समरक्त आहेत असे म्हटले जाते. हे केवळ तिसऱ्या श्रेणीचे अंतर असलेल्या चुलत, मावस वगैरे भावंडांमध्ये (चुलत-चुलत-चुलत इ.) असू शकते. चौथ्या श्रेणीचे अंतर असलेली भावंडे असतील तर समरक्तता स्तर १० च्या आसपास असतो. त्यात एखाद्या श्रेणीत सावत्र भावंड असेल तर समरक्तता स्तर इतका कमी असतो की ते जनुकीय दृष्ट्या परकेच असल्यासारखे असतात.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: