हाथरस वृत्तांकनः मल्याळी पत्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा

हाथरस वृत्तांकनः मल्याळी पत्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा

नवी दिल्लीः हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचे वृत्तांकन करण्यासाठी हाथरसला जाणारे मल्याळी पत्रकार सिद्धीकी कप्पान यांच्यासह तीन अन्य जणांना सोमवारी उ.

भीमा-कोरेगाव प्रकरण एनआयएकडे सोपवणार नाही – मुख्यमंत्री
मनरेगाची जाती-जमाती निहाय मजुरी पद्धत बंद
ब्रिटनमध्ये बोरिस पुन्हा सत्तेवर

नवी दिल्लीः हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचे वृत्तांकन करण्यासाठी हाथरसला जाणारे मल्याळी पत्रकार सिद्धीकी कप्पान यांच्यासह तीन अन्य जणांना सोमवारी उ. प्रदेश पोलिसांनी मथुरेतून अटक करून त्यांच्यावर यूएपीए व देशद्रोहाचे आरोप लावले.

या चार जणांकडे हाथरस प्रकरणातील मृत तरुणीला न्याय द्या अशा स्वरुपाची छापील पत्रके होती व हे चौघे शांततेचा भंग करण्यासाठी हाथरसला जात होते. त्यांचे घटनास्थळी जाणे हाच कटाचा भाग असल्याचे आरोप पोलिसांनी या चौघांवर लावले आहेत.

दरम्यान, कप्पान यांच्या अटकेवर मंगळवारी देशातील अनेक पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. कप्पान हे मल्याळी पत्रकार दिल्लीत राहात असून ते केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट संघटनेचे दिल्ली शाखेचे सचिव आहेत. तर अन्य तिघांची नावे अतिक उर रहमान, मसूद अहमद व आलम अशी आहेत. या तिघांपैकी रहमान व अहमद हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या विद्यार्थी शाखेचे सदस्य असून आलम हा गाडी चालवत होता.

उ. पोलिसांच्या या कारवाईवर पीएफआयने प्रतिक्रिया देत पत्रकारांची भेट हे कटकारस्थान असल्याचा खोटा दावा करत हाथरस घटनेला वेगळे वळण देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. उ. प्रदेशातील व देशातील जनतेचा संताप योगी सरकारवर वाढत असून सरकारच्या अशा कारवाईला आम्ही घाबरत नाही, असेही पीएफआयने म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: