बलात्कार झालाच नाही – उत्तर प्रदेश पोलिस

बलात्कार झालाच नाही – उत्तर प्रदेश पोलिस

नवी दिल्लीः उ. प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी गुरूवारी वेगळेच वळण दिले. मृत मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे कोणतेही पुरावे मिळाले

पहलू खानवरील गो-तस्करीचा खटला हायकोर्टाकडून रद्द
संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी होणार – अमित शहा
शोपियन एन्काउंटरः मुलाचे शव द्या; वडिलांची मागणी

नवी दिल्लीः उ. प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी गुरूवारी वेगळेच वळण दिले. मृत मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, असे शवविच्छेदन अहवाल प्रमाणपत्र अलिगड रुग्णालयाने दिल्याचे हाथरसचे जिल्हा पोलिस प्रमुख विक्रांत वीर यांनी सांगितले. गंभीर बाब अशी की पीडित मुलीचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी हा शवविच्छेदन अहवाल अलिगड रुग्णालयाने पोलिसांना दिला आहे.

पीडित मुलीला मारहाण करण्यात आली होती पण तिच्यावर जबर संभोग केला नव्हता. या संदर्भातील फोरेन्सिक अहवालाची आम्ही वाट पाहत असून रुग्णालयातील डॉक्टरांनी बलात्काराची घटना फेटाळल्याचे वीर यांचे म्हणणे होते. तर दुसरीकडे उ. प्रदेश अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी फोरेन्सिक अहवालात मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. मुलीच्या शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू मणक्याला जबर मार बसल्याने मानसिक धक्क्याने झाला असून घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यात वीर्य सापडले नव्हते. काही जण या घटनेला जातीयवादाचे रुप देत असल्याचा आरोप कुमार यांनी केला.

या मुलीच्या शवविच्छेदनात अहवालानुसार, काही अज्ञातांनी मुलगी शेतात काम करताना तिचा गळा मागून दुपट्ट्याने दाबला. ही घटना १४ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ४.१० वाजता घडली. मुलीच्या गळ्यावर पुढे काही व्रणही आढळून आले. झटापटीत मुलीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्याने ती लुळी पडली व अखेर मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुलीच्या गळ्यावर दुपट्ट्याने दाबल्याचे वण आढळले. हा प्रकार अनेक वेळा झाला पण गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाला नाही, असे या अहवालात म्हटले आहे.

व्हिसेरा आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल असे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.

या संदर्भात केरळचे माजी पोलिस महासंचालक एन. सी. अस्थाना यांच्याशी द वायरने संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात बलात्कार झाला नसल्याचे मत खोडून काढले.

ते म्हणाले, २०१३मध्ये गुन्हे कायदा दुरुस्तीनुसार बलात्काराची व्याख्या बदलण्यात आली आहे. त्यात योनीमध्ये शिश्नप्रवेश झाल्यानंतरच बलात्कार झाला अशी जी बलात्काराची पारंपरिक व्याख्या केली जात होती त्यात बदल करून स्त्रीच्या योनी, मूत्रमार्ग वा गुदद्वारावर केलेली कोणतीही इजा वा कोणत्याही शारिरीक व अन्य वस्तूचा स्पर्श हा बलात्कार मानला जातो. उ. प्रदेश पोलिस व डॉक्टर हे या घटनेकडे पारंपरिक दृष्टिकोनातून पाहात आहेत. योनीमध्ये वीर्याचे अंश सापडले नाहीत म्हणजे बलात्कार झाला नाही, असे म्हणता येत नाही. बलात्काराच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने या पूर्वी आपले अनेक निर्णय दिले आहेत. हाथरसच्या घटनेत दोन आठवडे मुलगी इस्पितळात उपचार घेत होती, त्या कालावधीत या मुलगी बेशुद्धावस्थेत असताना पुरावे मिटवण्याचेही प्रयत्न केले जाऊ शकतात.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0