एकाहून अधिक लैंगिक जोडीदार असलेल्यांमध्ये हिंदू पुरुष आघाडीवर

एकाहून अधिक लैंगिक जोडीदार असलेल्यांमध्ये हिंदू पुरुष आघाडीवर

नवी दिल्ली: एकाहून अधिक लैंगिक जोडीदार असलेल्या भारतातील सर्व धर्मांच्या पुरुषांमध्ये हिंदूधर्मीय पुरुष आघाडीवर आहेत. त्याखालोखाल शीख, ख्रिश्चन, बौद्ध

झुंडबळी हा भारताला बदनाम करणारा कट – सरसंघचालक
यासिन मलिकला जन्मठेप हा काश्मीर समस्येवरचा उपाय नाही
लॉर्डस् कसोटी: भारताचा “न भूतो न भविष्यति” विजय….

नवी दिल्ली: एकाहून अधिक लैंगिक जोडीदार असलेल्या भारतातील सर्व धर्मांच्या पुरुषांमध्ये हिंदूधर्मीय पुरुष आघाडीवर आहेत. त्याखालोखाल शीख, ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम व जैन या धर्मांतील पुरुषांचे क्रमांक लागतात.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५च्या ‘द वायर’ने केलेल्या विश्लेषणानुसार, विवाहबाह्य किंवा लिव्ह-इन नातेसंबंध ठेवण्यात हिंदू पुरुष आघाडीवर आहेत. हिंदू पुरुषांच्या आयुष्यातील लैंगिक जोडीदारांची सरासरी संख्या २.२ आहे. शीख व ख्रिश्चनांमध्ये ती १.९ आहे, तर बौद्ध व मुस्लिमांमध्ये सरासरी १.७ आहे. जैनांमध्ये हे प्रमाण सर्वांत कमी म्हणजे १.१ आहे.

एकाहून अधिक लैंगिक जोडीदार असलेल्या तसेच असुरक्षित समागम करणाऱ्या पुरुषांमध्ये ह्युमन इम्युनोडेफिशिएन्सी व्हायरस अर्थात एचआयव्हीची लागण होण्याचा धोका अधिक असतो, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

हे सर्वेक्षण मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अभ्यास संस्थेने २०१९-२० सालात केंद्र सरकारसाठी केले होते. २९ राज्ये व सात केंद्रशासित प्रदेशांतील ८.२५ लाख उत्तरदात्यांपैकी १.०१ लाख पुरुषांनी या सर्वेक्षणात भाग घेतला. एनएफएचएस-५ सर्वेक्षणातील निष्कर्ष एनएफएचएस-४ (२०१५-१६) मधील निष्कर्षांहून वेगळे आहेत. चौथ्या सर्वेक्षणानुसार, एकाहून अधिक लैंगिक जोडीदार ठेवणाऱ्या पुरुषांचे प्रमाण ख्रिश्चनधर्मीयांमध्ये (२.४) सर्वाधिक होते. त्याखालोखाल प्रमाण (२.१) बौद्ध व  मुस्लिमांमध्ये होते, तर हिंदूंमध्ये ते सर्वांत कमी म्हणझे १.९ होते.

एकंदर एकाहून अधिक लैंगिक जोडीदार ठेवण्याची प्रवृत्ती चौथ्या सर्वेक्षणाच्या तुलनेच पाचव्या सर्वेक्षणाच्या कालावधीत २.१ पटींनी वाढले आहे.

आपली पत्नी किंवा जिच्यासोबत राहतो ती स्त्री सोडून, अन्य स्त्रीसोबत समागम करणाऱ्या पुरुषांची, सर्वेक्षणापूर्वीच्या १२ महिन्यांच्या काळातील टक्केवारी शोधण्याचा प्रयत्न या अहवालाने केला आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे ७.८ टक्के बौद्ध पुरुषांनी या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी दिले. या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देणाऱ्यांमध्ये त्याखालोखाल शीख (६.० टक्के), हिंदू (४.० टक्के) आणि मुस्लिम (२.६ टक्के) यांचे क्रमांक लागतात. एकंदर भारतातील ४ टक्के पुरुषांनी त्यांची पत्नी किंवा सोबत राहणारी स्त्री वगळता अन्य स्त्रीसोबत, सर्वेक्षणापूर्वीच्या १२ महिन्यांत, समागम केला आहे, असे या सर्वेक्षणातून स्पष्ट होते. पुरुषांच्या लैंगिक जोडीदारांची सरासरी संख्या किती होती या प्रश्नाहून हा प्रश्न वेगळा होता याची नोंद येथे घेतली पाहिजे.

एकाहून अधिक लैंगिक जोडीदार असलेल्यांना सतावणारी सर्वांत मोठी चिंता म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंद होय. सर्वेक्षणापूर्वीच्या १२ महिन्यांच्या काळात अनेक जोडीदारांसोबत समागम करणाऱ्या पुरुषांपैकी कॉण्डोमचा वापर केल्याचे सांगणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण मुस्लिम पुरुषांचे (६४.१ टक्के) आहे. त्याखालोखाल प्रमाण हिंदू (६०.२ टक्के), बौद्ध (५८.२ टक्के) आणि ख्रिश्चन (४४.७ टक्के) यांच्यात आहे.

संपत्तीचे वितरण व अनेक जोडीदारांचे प्रमाण यांचा विचार केला असता, यात फारसे वैविध्य आढळले नाही. सर्वांत निम्न, दुसऱ्या, मध्यम व चौथ्या स्तरांतील २.०-२.५ टक्क्यांनी ते या प्रकारात गुंतल्याची कबुली दिली. अनुसूचित जमातींतील पुरुषांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २.४ टक्के आहे, तर अन्य मागासवर्गीयांमध्ये २.२ टक्के व अनुसूचित जातींमधील पुरुषांमध्ये ते २.१ टक्के आहे. ‘अन्य’ प्रवर्गांतील पुरुषांमध्ये हे प्रमाण २ टक्क्यांहून कमी आहे, असे एनएफएचएस-५मध्ये आढळले.

राज्यांमध्ये मेघालय आघाडीवर आहे, त्याखालोखाल सिक्किम व आंध्रप्रदेश यांचे क्रमांक लागतात.

एकाहून अधिक लैंगिक जोडीदार असलेले पुरुष या जोडीदारांचा उल्लेख  ‘स्पाउज’ म्हणून करतातच असे नाही. टाइम्स ऑफ इंडियाने यापूर्वीही बहुपत्नीत्वाच्या प्रथेबद्दल बातम्या दिल्या आहेत. हे प्रमाण मुस्लिमांमध्ये सर्वाधिक (१.९ टक्के) असल्याचे यापैकी एका बातमीत म्हटले आहे. मात्र, ‘द वायर’च्या विश्लेषणानुसार, हिंदू पुरुषांच्या आयुष्यभरातील लैंगिक जोडीदारांची संथ्या याहून अधिक आहे. हिंदू पुरुषांमधील बहुपत्नीत्वाचे प्रमाण १.३ टक्के आहे.

विशेष विवाह कायद्यानुसार, भारतात मुस्लिमांना एकाहून अधिक लग्ने करण्याची कायद्याने परवानगी आहे.  हिंदू विवाह कायद्यानुसार हिंदूंना मात्र एकाहून अधिक लग्ने करण्यास बंदी आहे. मात्र, पुरुषांमध्ये एकाहून अधिक लैंगिक जोडीदार असण्याचे प्रमाण वाढत असले, तरी बहुपत्नीत्वाचे प्रमाण मात्र कमी होत चालले आहे, असे एनएफएचएस-५मध्ये नमूद करण्यात आले आहे.

चंडीगढ, दिल्ली, पंजाब, राजस्थान, झारखंड, मेघालय, त्रिपुरा, महाराष्ट्र आणि पुदुच्चेरी या नऊ राज्यांचा अपवाद वगळता अन्य सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत २०१९-२१ या काळात, २०१५-१६ या काळाच्या तुलनेत, बहुपत्नीत्वाचा दर कमी झाला आहे.

बहुपत्नीत्वाचे प्रमाण मेघालयात सर्वाधिक ६.१ टक्के आढळले, तर त्याखालोखाल मिझोरामचा (४.१ टक्के) क्रमांक लागतो. एकाहून अधिक लैंगिक जोडीदार असलेल्या पुरुषांमध्ये ग्रामीण भागातील पुरुषांची संख्या शहरी भागातील पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0