हेमंत नगराळे नवे पोलीस महासंचालक

हेमंत नगराळे नवे पोलीस महासंचालक

राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून हेमंत नगराळे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. सुबोधकुमार जयस्वाल यांच्या जागी महाराष्ट्र राज्याचे पोलीस म

हवालदारांचा पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मार्ग मोकळा
अर्णव अटकः महाराष्ट्र पोलिसांची राजनिष्ठता व पक्षनिष्ठता
राज्यातील हजारो पोलिस अंमलदारांना पदोन्नतीची संधी

राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून हेमंत नगराळे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

सुबोधकुमार जयस्वाल यांच्या जागी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नगराळे यांची वर्णी लागली आहे. सध्या तरी नगराळे यांच्याकडं या पदाचा अतिरिक्त कार्यभार असेल. या पदासाठी अनेक मोठ्या नावांची चर्चा होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी नगराळे यांच्या नावाला पसंती दिली आहे.

हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी सहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतले. नगराळे हे मेकॅनिकल इंजिनीअर असून फायनान्स मॅनेजमेंट विषयात त्यांनी मास्टर्स केलं आहे. १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या नगराळे यांच्याकडं सध्या कायदे व तंत्रज्ञान विभागाच्या महासंचालकपदाची जबाबदारी आहे. त्यासोबतच त्यांना महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. पुढचे १९ महिने ते महासंचालकपदी राहू शकतात.

नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांसह दिल्लीतही सेवा बजावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती. १९९२ ते १९९४ या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते. सोलापूर जिल्ह्यात नवे आयुक्तालय सुरू करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. १९९२ च्या दंगलीनंतर सोलापूरमधील कायदा व सुव्यस्थेची स्थिती त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली होती. त्याबद्दल त्यांची प्रशंसा करण्यात आली होती.

१९९६ ते १९९८ मध्ये पोलीस अधीक्षक, सीआयडी व गुन्हे शाखेत विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली होती.

लहान मुलांचे अपहरण व हत्या करणाऱ्या कुप्रसिद्ध अंजनाबाई गावित हिच्या विरोधातील प्रकरणाची चौकशीही नगराळे यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयानं कालांतरानं गावित हिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. १९९८ ते २००२ या काळात सीबीआयसाठी मुंबई व दिल्लीतही सेवा बजावली. सीबीआयच्या सेवेत असताना बँक ऑफ इंडियातील केतन पारेख घोटाळा, माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, हर्षद मेहताचा घोटाळा अशा अनेक प्रकरणांच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेलगी मुद्रांक घोटाळ्याच्या चौकशीत त्यांनी केलेल्या तपासाचं कौतुक झालं होते.

राज्याचा पोलीस महासंचालक म्हणून काम करताना माझ्यावर मोठी जबाबदारी आहे याची जाणीव असून त्याला कोठेही तडा जाऊ दिला जाणार नाही, असे हेमंत नगराळे यांनी द वायर शी बोलताना सांगितले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे हे प्रथम कर्तव्य असून सर्वसामान्य नागरिकांना पोलीस स्टेशनचr कधीही भीती वाटणार नाही तर आदरच वाटेल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे नगराळे यांनी सांगितले.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: