आरे : पर्यावरणवाद्यांच्या चार याचिका फेटाळल्या

आरे : पर्यावरणवाद्यांच्या चार याचिका फेटाळल्या

मुंबई : गोरेगाव उपनगरातील प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांच्या चार याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या. ही प्रस

#SaveAareyforest संतप्त झाला सोशल मीडिया
सूर लागावा, सौंदर्य खुलावे
आरे कॉलनी आंदोलन सुरूच

मुंबई : गोरेगाव उपनगरातील प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांच्या चार याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या. ही प्रस्तावित मेट्रो कारशेड आरे कॉलनीत होणार असल्याने तेथील २,६४६ झाडे तोडली जाणार होती आणि या वृक्षतोडीला महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली होती.

या मंजुरीच्या विरोधात गेले काही दिवस आरे बचाव आंदोलन पर्यावरण संस्था, नागरी चळवळ, सामान्य नागरिक व अन्य स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू होते. ‘वनशक्ती’ या एनजीओने आरेला जंगल घोषित करावे अशीही विनंती उच्च न्यायालयात याचिका दाखल करून केली होती. पण ही याचिकाही न्यायालयाने फेटाळली.

पर्यावरण प्रेमी झोरु भथेना यांची याचिका वृक्षप्राधिकरणाच्या २,६४६ वृक्ष तोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी होती. तसेच दुसरी याचिका मेट्रो कारशेडचे बांधकाम मिठी नदीच्या पूरक्षेत्रात असल्याचा दावा करणारी होती. या दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या. झोरु भथेना यांच्या वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेला मुंबई वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य व महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी समर्थन केले होते. त्यांना न्यायालयाने ५० हजार रु.चा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने आरे कॉलनी वनक्षेत्र व मिठी नदी पूरक्षेत्र या दोन्ही मुद्द्यांविषयी याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी असल्याने तेथे याचिकादारांनी दाद मागावी असे सुचवले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आरे पर्यावरणवाद समर्थकांपुढे आहे.

मात्र रात्रीच आरेमधील झाडे तोडण्याचे काम सुरु झाले असून, कार्यकर्त्यांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0