मराठवाड्यात सर्वांधिक ई- पीक नोंदणी

मराठवाड्यात सर्वांधिक ई- पीक नोंदणी

मुंबई: महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात १५ ऑगस्ट २०२१ पासून ई- पीक पाहणी या व्यापक प्रकल्पाची अंमलब

शेतीप्रश्न, शेतीचे प्रश्न व शेतकऱ्यांचे आंदोलन
सोयाबीन पिकाच्या संकटास जबाबदार कोण?
दूध आंदोलनः अमेरिकेच्या दुग्ध उत्पादनांना बाजारपेठ खुली

मुंबई: महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात १५ ऑगस्ट २०२१ पासून ई- पीक पाहणी या व्यापक प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली होती. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत ८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर नोंदणी केली असून मराठवाड्यात सर्वांधिक नोंदणी झाली आहे.

शुक्रवार अखेर ई- पीक पाहणी  प्रकल्पाअंतर्गत, ८९ लाख ३९ हजार ८४८ शेतकऱ्यांनी ई – पीक ॲपवर नोंदणी केली आहे, तर ६४ लाख ४८ हजार ३६८ शेतकऱ्यांची ई- पीक ॲपवरील नोंदणी पूर्ण झाली आहे.

औरंगाबाद विभागात २० लाख ७५ हजार १०८ पैकी १७ लाख २७ हजार ९१६, आणि नाशिक विभागात १९ लाख ३४ हजार ७६७ पैकी, १३ लाख ८९ हजार ७५६ ई-पीक पाहणी नोंदणी झाली आहे. तर अमरावती विभागात १४ लाख १५ हजार २५२ पैकी, ११ लाख ९७ हजार २७५ आणि पुणे विभागात २० लाख ३३ हजार ४४१ पैकी, ९ लाख ९४ हजार ७४७ नोंदणी पूर्ण झाली आहे. नागपूर विभागात ११ लाख ५० हजार २०३ पैकी, ९ लाख ९३ हजार ७०९ आणि कोकण विभागात ३ लाख ३१ हजार ०७७ पैकी, १ लाख ४४ हजार ९६५ शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी पूर्ण केली आहे.

ई-पीक पाहणी हा व्यापक प्रकल्प असून हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा आहे. जमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे देखील सुलभ होणार आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मदत होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0