वाराणसीत बिगर हिंदूंच्या प्रवेशास बंदीची पोस्टर

वाराणसीत बिगर हिंदूंच्या प्रवेशास बंदीची पोस्टर

लखनऊः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदार संघ वाराणसीमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या काही सदस्यांकडून बिगर हिंदूंना गंगा नदीच्या घाटांवर

केरळमध्ये माकपा, कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या
विहिंप, बजरंग दलाच्या धमकीमुळे कुणाल कामरांचा कार्यक्रम रद्द
नांदेड स्फोटात उजव्या विचारसरणीच्या नेत्यांची भूमिका – माजी संघ स्वयंसेवकाचा दावा

लखनऊः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदार संघ वाराणसीमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या काही सदस्यांकडून बिगर हिंदूंना गंगा नदीच्या घाटांवर जाण्यास मनाई करणारी काही भित्तीपत्रके लावण्यात आली आहे. या भित्तीपत्रकांवर हिंदीमध्ये ‘प्रवेश प्रतिबंधित- गैर हिंदू’ असा मजकूर आहे. ही भित्तीपत्रके वाराणसीच्या घाटांवर लावण्यात आलेली आहेत.

त्याच बरोबर माँ गंगा, काशीचे घाट व मंदिर सनातन धर्म हे भारतीय संस्कृती, श्रद्धा व परंपरांचे प्रतीक असून याच्यावर ज्यांचा विश्वास आहे, त्यांनाच येथे येण्यास परवानगी आहे. हे तीर्थक्षेत्र पिकनिक स्पॉट नाही, असेही भित्तीपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.

या भित्तीपत्रकांची छायाचित्रे या संघटनांच्या नेत्यांनी सोशल मीडियात प्रसिद्धही केली आहेत.

या भित्तीपत्रकात, हे केवळ निवेदन नाही तर इशारा आहे, अशीही धमकावण्याची भाषा आहे. या भित्तीपत्रकांच्या अखेरीस विश्व हिंदू परिषद-बजरंग दल काशी असे नमूद करण्यात आले आहे.

या भित्तीपत्रकांवर पंचगंगा घाट, राम घाट, दशाश्वमेध घाट, अस्सी घाट व मणिकर्णिका घाट यांची छायाचित्रे आहेत.

उ. प्रदेशात लवकरच विधान सभा निवडणुका होत असून धार्मिक ध्रुवीकरणाच्या दृष्टीने कट्टरवादी हिंदू संघटनांकडून भाजपचा असा अप्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या या कृतीबाबत अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही वा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही.

सध्या ही भित्तीपत्रके वाराणसीच्या घाटांवर दिसत असली तरी ती पुढे वाराणसीतील अन्य मंदिरांमध्ये लावण्याचे या संघटनांचे प्रयत्न आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी-विश्वनाथ कॉरिडोरचे उद्घाटन केले होते, त्या मार्गावर असा प्रचार केला जाणार आहे.

या संदर्भात विहिपच्या वाराणसी भागाचे सचिव राजन गुप्ता यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ही भित्तीपत्रके निवेदन नाहीत तर तो इशारा असून जे कोणी सनातन धर्माचे पाईक त्यांना हा इशारा आहे. गंगा नदीवरचे घाट, काशीमधील हिंदू मंदिरे हे हिंदू धर्म व संस्कृतीचे प्रतीक असून यांच्यापासून अन्य जणांनी दूर राहिले पाहिजे. ज्यांना हिंदू धर्माविषयी आस्था आहे, त्यांचे येथे स्वागत आहे अन्यथा त्यांनी या पवित्र धर्मक्षेत्रापासून दूर राहावे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0