मोस्ट वाँटेड दहशतवादी रियाझ नाइकू चकमकीत ठार

मोस्ट वाँटेड दहशतवादी रियाझ नाइकू चकमकीत ठार

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एक मोस्ट वाँटेड दहशतवादी रियाझ नाइकू बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या

उ. प्रदेशात सर्व मदरशांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य
दिशा, निकिता, शांतनूवर गंभीर आरोप
पाकिस्तानात शैक्षणिक स्वातंत्र्याची गळचेपी

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एक मोस्ट वाँटेड दहशतवादी रियाझ नाइकू बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला.

२०१६मध्ये बुर्हाण वाणी या दहशतवाद्याला ठार मारल्यानंतर हिज्बुलची यंत्रणा रियाझ नाइकूने आपल्या ताब्यात घेतली होती आणि  काश्मीरमधील दहशतवादाचा तो एक प्रमुख चेहरा होता.

मंगळवारी रात्री रियाझ नाइकू व त्याचे काही साथीदार द. काश्मीरमधील बागपुरा येथील त्याच्या गावात असल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार जम्मू व काश्मीर पोलिस, लष्कर व सीआरपीएफच्या जवानांनी त्याला घेरण्यासाठी आसपासच्या भाताची शेती व सफरचंदांच्या बागांमध्ये दबा धरला होता. रियाझ जमिनीखाली खंदकात लपून बसला असेल ही शक्यताही लक्षात घेऊन या जवानांनी रेल्वेमार्गासाठी वापरण्यात येणारे खोदकामाचे मशीनही वापरण्याचा निर्णय घेतला होता.

अखेर बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास चकमक होऊन रियाझ व त्याचे साथीदार ठार झाले. बुर्हाण वाणीनंतर काश्मीरात ठार मारण्यात आलेला रियाझ हा अत्यंत महत्त्वाचा दहशतवादी होता, असे लष्करी सूत्रांचे म्हणणे आहे. रियाझवर १२ लाख रु.चे बक्षिसही लावण्यात आले होते. रियाझला ठार मारणे हे सुरक्षा दलाच्या दृष्टीने गेल्या दोन वर्षांतले सर्वात मोठे यश मानले जात आहे.

काश्मीरमधील दहशतवादाला मोठा धक्का

रियाझ गेली ८ वर्षे सुरक्षा दलांना चकवा देत होता. पूर्वी तो लष्कर-ए-तयब्बा या दहशतवादी संघटनेत कार्यरत होता. पण नंतर तो हिज्बुल मुजाहिदीनच्या वरच्या रँकमध्ये आला. त्याच्या काश्मीरमधील कारवायानंतर त्याला A++ कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले होते. बुर्हान वाणीला ठार मारल्यानंतर काश्मीरमधील हिज्बुलच्या कारवाया रियाझच्या नेतृत्वाखाली केल्या जात होत्या. रियाझने त्यावेळी हिज्बुलचा एक बडा कमांडर जाकीर मुसाची जागा घेतली होती. गेल्या मे महिन्यात मुसा चकमकीत मारला गेला होता. त्यानंतर हिज्बुलचा आणखी एक दहशतवादी यासिन यातू उर्फ मेहमूद गझनवी हा २०१७मध्ये ठार झाला. त्यानंतर हिज्बुलमध्ये निर्माण झालेली पोकळीत रियाझला स्थान मिळाले. त्याने द. काश्मीरमधील दहशतवादी संघटनांतील मतभेद कमी आणले होते. त्याने स्वत:ची प्रतिमाही फारशी उंचावण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे तो ८ वर्षे सुरक्षा दलाला गुंगारा देत होता.

तंत्रज्ञानात कुशल असलेल्या रियाझने फेसबुक व अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून काश्मीरमधील दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवले होते. त्याच्यामुळे दहशतवादी सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वापरू लागले होते. त्याने काश्मीरमधल्या दहशतवादाला राजकीय रंग देण्यास सुरूवात केली. काश्मीरच्या इतिहासात सर्वाधिक काळ जिवंत राहणारा तो एकमेव दहशतवादी होता, असे एका सुरक्षा अधिकार्याने सांगितले.

काश्मीरमध्ये जे दहशतवादी सुरक्षा दलाच्या कारवाईत मारले जात होते, त्यांना आदरांजली वाहण्याची एक प्रथा रियाझने सुरू केली. मृत दहशतवाद्याच्या थडग्यावर जाऊन हवेत गोळीबार करणे ही एक प्रथा त्याने सुरू केली होती.

२०१८मध्ये रियाझ नाइकूने जम्मू व काश्मीर पोलिस दलातील एका कर्मचार्याच्या ११ कुटुंबियांचे अपहरण केले होते. आपले वडील असादुल्लाह मीर यांची सुटका केल्यानंतर या ओलिसांना सोडण्यात येईल अशी धमकीही त्याने दिली होती.

रियाझने काश्मीर खोर्यात अनेक चकमकीत पोलिसांना लक्ष्य केले होते.

रियाझ नाइकू कोण होता?

२०१०मध्ये श्रीनगरमध्ये एका निदर्शनादरम्यान पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे तौफेल अहमद मट्टू या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलिसांवर जोरदार दगडफेक झाली होती. त्यात अनेक युवकांना अटक करण्यात आली होती, त्यापैकी रियाझ नाइकू हा एक तरूण होता.

रियाझ २०१२ रोजी तुरुंगातून बाहेर पडला. त्याने काही महिने घरात घालवले व नंतर त्याने उच्चशिक्षणासाठी आपण बाहेर जात असल्याचे घरच्यांना सांगितले. नंतर २३ मे २०१२ रोजी त्याने मित्राला भेटायला जातो म्हणून घर सोडले त्यानंतर तो परत घरी आला नाही. पोलिसांनी नंतर नाइकूच्या कुटुंबियांना रिझाय दहशतवादी गटामध्ये सामील झाल्याची माहिती दिली.

१९८५चा जन्म असलेल्या रियाझचे वडील शिंपी असून त्यांची स्वत:च्या मालकीची सफरचंदाची बागही आहे.

रियाझला जेव्हा मोस्ट वाँटेड म्हणून घोषित केले तेव्हा त्याच्या घराची तपासणी पोलिसांनी केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0