अज्ञान्यांच्या हातात डिजिटल मीडियाचे शस्त्र!

अज्ञान्यांच्या हातात डिजिटल मीडियाचे शस्त्र!

आपण सध्या अचानकच कठीण आणि अनिश्चित कालखंडात सापडलो आहोत. अज्ञात भविष्यकाळाची भीती आणि धास्ती गोंधळ निर्माण करत आहे. या भीतीत आणखी भर घालायची नसेल, तर

भारतात ४० कोटी बेरोजगार : आंतरराष्ट्रीय मजूर संघटना
राज्यात ४ जिल्ह्यांत पॉझिटिव्हीटी दर जास्त
२० एप्रिलनंतर मनरेगा, शेती, मत्स्यपालन, पोल्ट्री उद्योगांना सूट

आपण सध्या अचानकच कठीण आणि अनिश्चित कालखंडात सापडलो आहोत. अज्ञात भविष्यकाळाची भीती आणि धास्ती गोंधळ निर्माण करत आहे. या भीतीत आणखी भर घालायची नसेल, तर आपल्याकडून पसरवल्या जाणाऱ्या माहितीबद्दल, विशेषत: सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्सद्वारे पसरवल्या जाणाऱ्या माहितीबद्दल आपण खूप काळजीपूर्वक वागले पाहिजे.

काही माहिती समोर आली तर स्वत:ला विचारा:ही माहिती विश्वासार्ह आहे का? ती तांत्रिक असेल, तर तिचे विश्लेषण करण्याइतपत माहिती माझ्याकडे आहे का? यापूर्वी ती कुठे आली आहे का? जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य मंत्रालयाने या माहितीबद्दल काही सांगितले आहे का? व्हॉट्सअॅपवर आलेला सरकारी आदेश अधिकृत वेबसाइटवरील प्रसिद्ध झाला आहे की नाही, हे तुम्ही पडताळले आहे का? यात किंचितही शंका आली तरी अशी माहिती शेअर किंवा फॉरवर्ड करण्याचा मोह आपण टाळला पाहिजे.नाहीतर यामुळे चुकीची माहिती पसरले आणि लोकांना असलेला धोका वाढेल.

कोरोना व्हायरसची साथ म्हणजे अनेकांसाठी आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन चातुर्य आणि माहितीच्या स्वरूपात करण्याची संधी आहे.त्याला सांस्कृतिक अभिमानाचे वलयही जोडले जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने अनेकांना तज्ज्ञ, विद्वान, डॉक्टर किंवा एकंदर सर्वज्ञ केले आहे.हातात मोबाइल फोन आणि एकंदर बेताची समज या जोरावर हे लोक इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करून चुकीच्या माहितीचा प्रसार करतात आणि हे तब्येतीवर वर स्वत:च्या मनाने प्रयोग करणाऱ्यां घातक ठरू शकते.

कोरोना व्हायरस (सार्स-कोव्ही-टू) आजाराच्या साथीसोबत पसरत असलेल्या माहितीबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे.  या आजाराबद्दल खुळचट माहिती पसरवली जात आहे, वेडगळ उपाय सुचवले जात आहेत. हे का होत आहे? अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर भीती आणि आशा यांच्या जोरावर अशी सनसनाटी माहिती पसरवली जाते. धोक्याची अतिशयोक्ती करणे ही तर मनाची बचाव यंत्रणा आहेच. रोगाच्या साथी, नैसर्गिक आपत्ती आणि युद्धाच्या काळात हे नेहमीच होते. सध्याची परिस्थिती अधिक जटील आणि घातक करणारे तीन घटक आहेत. एक म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेला पडताळणी न केलेला माहितीचा साठा; दुसरा म्हणजे डिजिटल मीडियामुळे होणारा वेगवान प्रसार आणि व्याप्ती आणि तिसरा म्हणजे सामाजिक आणि राजकीय धृवीकरण. यातून कारस्थानाचे सिद्धांत आणि आक्रमक कट्टर अभिमानाने भरलेल्या शास्त्राचा मुलामा दिलेल्या खोट्या कथा निर्माण होतात. या अनेकदा सर्दी-खोकल्यावरील घरगुती उपायांच्या असतात.

दुसरा वर्ग स्वत: निदान करणारा. म्हणजे तुम्ही १० सेकंद श्वास रोखून धरू शकत असाल, तर तुम्ही करोनाबाधित नाही वगैरे. कष्टाने शोधलेल्या आणि प्रक्रिया केलेल्या अस्सल माहितीच्या तुलनेत इंटरनेटवरील चुकीची माहिती पसरवणे सोपे असते. ही माहिती अधिकृत वाटणाऱ्या दस्तावेजांच्या स्वरूपात, लोगो आणि सील्ससह पसरवली जाते. यात तज्ज्ञांचा हवालाही दिलेली असतो. फेसबुक, ट्विटर आणि त्याहून अधिक व्हॉट्सॅपवर अशी वेडगळ माहिती खूप पसरते.  कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मास्क हा सर्वोत्तम उपाय ही अशीच चुकीची माहिती आहे. यामुळे मास्क लावणाऱ्यांना अतिआत्मविश्वास येऊन ते आवश्यक खबरदारी घेत नाहीत आणि खरोखरच्या गरजूंना मास्कचा तुटवडा भासू शकतो.

हा भाबडेपणाला अधिकृत धोरणाचे स्वरूप येणे अधिक चिंताजनक आहे. आयुर्वेदिक, युनानी व होमिओपॅथिक उपचारांनी कोरोनाचे लक्षणाधारित व्यवस्थापन होऊ शकते अशी शिफारस आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांमध्ये करण्यात आहे. ही सूचना सामान्य परिस्थितीसाठी आहे हे नंतर मंत्रालयाने स्पष्ट केले. कोरोनाविषाणूची लागण झाल्यास क्लोरोक्विन आणि हायड्रोक्झिक्लोरोक्विनच्या वापरास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आततायी समर्थन दिले. या औषधांचा लोकांनी एवढा साठा केला की सध्या ज्यांना ते आवश्यक आहे त्यांनाही मिळत नाही आहे. लोक स्वत:हून ही औषधे घेत आहेत आणि अमेरिका व नायजेरियात यामुळे मृत्यू झाले आहेत.

यात व्यापक कटही आहेत. कोरोनाव्हायरस ही फाइव्हजी मोबाइल तंत्रज्ञानाची निष्पत्ती आहे ही त्याचेच एक उदाहरण. या विषाणूमुळे माणसाचे रूपांतर रक्तपिपासू झोंबीत होत नाही हे सांगण्यासाठी मलेशिया सरकारला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. कोरोनाव्हायरस हा ट्रम्पविरोधी जनमत तयार करण्यासाठी रचलेला कट आहे अशा आशयाचे मेसेजेस अमेरिकेतील उजवी फळी पसरवत आहे. हे सगळे स्पर्श केल्याने तसेच बाहेर जेवल्याने होत असल्याचा कांगावाही उजवी मंडळी करत आहेत.

खोलवर विचार केल्यास उजव्या विचारसणीचे लोकच विषाणूच्या स्रोत व कारणांबद्दल खोटे सिद्धांत मांडून त्याचा वापर स्थलांतरित, अल्पसंख्याकांविरोधात करत आहेत. ट्रम्प यांनी कोरोनाला ‘चायनीज व्हायरस’ म्हणणे किंवा भारतात ईशान्येकडील राज्यांतील लोकांवर हल्ले होणे हा याचाच भाग आहे. यात चीनला दैत्याचे रूप दिले जात आहे.

लोक या सगळ्या निरर्थक गोष्टींवर विश्वास कसा ठेवतात, हा तर प्रश्न तर आहेच. ढोबळमानाने बघितल्यास, बहुसंख्य जनतेकडे शिक्षण किंवा वैज्ञानिक तत्त्वांचा परिचय नसल्याने माहितीची पडताळणी करणे त्यांना जमत नाही. शिवाय, वैज्ञानिक मानसिकतेसाठी आवश्यक त्या साशंक वृत्तीचा अभाव बहुतेकांमध्ये असतोच.

याबाबत लोकांचे दोन विभाग करता येतात. यातील एका विभागातील लोकांच्या विचारांची सुरुवात तर तार्किक पद्धतीने होते. मात्र, कधीतरी एखाद्या वळणावर ते भुलतात आणि बनावट दस्तावेजांना शास्त्रशुद्ध माहिती समजू लागतात. होमिओपॅथीमध्ये कोरोनावर उपाय आहे हे सांगणारे सिद्धांत असेच पसरवले गेले. या सिद्धांतांची लेखनशैली अगदी अॅलोपथीमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेसारखी असल्याने तर्कबुद्धी असलेल्या लोकांनाही हळुहळू होमिओपॅथी ही समतुल्य व पर्यायी उपचारशाखा वाटू लागली. जनता कर्फ्युबद्दलच्या माहितीबाबतही हेच झाले. कोरोनाविषाणूचे आयुष्य १२ तास आहे आणि १४ तास सार्वजनिक स्थळे अस्पर्श राहिल्यास त्याची संक्रमण साखळी तुटू शकते हा प्रचार कमालीच्या पद्धतशीरपणे करण्यात आला. अशा प्रकारच्या संचारबंदीमुळे संपर्काचे प्रमाण कमी होते व ते उपयुक्त ठरते पण संक्रमणसाखळी तोडण्याचा दावा भंपकच होता. थाळीवादनाबाबतही कंपनांमुळे कोरोना विषाणू नष्ट होणार असे मेसेजेस पसरत होते. साथीच्या काळात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून सुचवण्यात आलेल्या या थाळीनादाने प्रत्यक्षात केवळ राजकीय उन्मादाला वाट करून दिली. यात सोशल डिस्टन्सिंगच्या तत्त्वाला तर हरताळ फासला गेलाच, शिवाय नंतरच्या काळात वैद्यकीय व्यावसायिकांना घरे रिकामी करण्यास सांगून लोकांनी सगळेच फोल ठरवले आहे.

दुसऱ्या विभागातील लोक मुळातच अंधश्रद्धा व अतार्किक समजांवर विश्वास ठेवणारे असतात. याला धार्मिक, सांस्कृतिक कारणे असतात. यात वयोवृद्धांनी, धार्मिक नेत्यांनी सांगितलेल्या गोष्टी प्रश्न न विचारता स्वीकारल्या जातात. यात धार्मिक आणि राष्ट्रवादी अभिमान येतो. सध्याच्या काळात टोकाचे राजकीय धृवीकरण आणि प्रचंड सामाजिक संताप यांच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक श्रेष्ठत्वामध्ये भिनलेल्या स्वाभिमानाला दहशतवादी स्वरूप आल्याची उदाहरणे आहेत. सगळे ज्ञानविज्ञान आमच्या प्राचीन ग्रंथांमध्ये आहेच या विचाराची याला जोड मिळते. मग गोमुत्र निर्जंतुकीकरणाचे साधन समजून या भाबड्या लोकांवर शिंपडले जाते.

प्राचीन भारतातील योगात दिलेली श्वसनतंत्रे कोरोनाचा प्रतिबंध करू शकतात, अश्वगंधा ही जडीबुटी कोरोनाचा नाश करते असे अनेक दावे तयार झाले. इस्लाममधील स्नानप्रथेमुळे हा विषाणू मारला जातो, असा प्रवाद इंडोनेशियात पसरला आहे. यापैकी कशावरही विश्वास ठेवून स्वत:ला सुरक्षित समजणारे लोक धोक्याच्या क्षेत्रात वावरत आहेत. या अज्ञानाचे भीषण व दूरगामी परिणाम भोगावे लागणार आहेत. कोरोनाव्हायरसचा उगम चीनमधील ‘वेट मार्केट्स’मधून झाला हे पुढे आल्यानंतर मांसाहाराविरोधात एक मोठी फळी उभी राहिली. याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायाला भोगावा लागत आहे.

लोकांनी चुकीची माहिती फॉरवर्ड न करता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा यासाठी कोणतेही आवाहन केले गेले नाही. या खोट्या माहितीचा मोठा भाग उजव्या विचारसरणीच्या लोकांद्वारे मुद्दाम तयार करण्यात आला आहे याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. डिजिटल मीडिया अशा रितीने कशावरही विश्वास ठेवणाऱ्या भाबड्या लोकांसाठी आणि त्याहून अधिक अशी बिनबुडाची माहिती तयार करणाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. फेसबुक आणि यूट्यूबसारखी माध्यमे या लोकांसाठी शस्त्रांसारखी ठरत आहेत. यापूर्वीही जगात असा निर्बुद्धपणा होता पण त्याच्या प्रसारासाठी एवढी साधने उपलब्ध नव्हती. आधुनिक तंत्रज्ञानाची गाठ प्राथमिक व विश्लेषणाची क्षमता नसलेल्या विचाराशी घातली गेल्यामुळे सांस्कृतिक व राजकीय लढाया लढणाऱ्यांच्या हातात एक मोठे शस्त्र मिळाले आहे हे नक्की.

अनुराग मेहरा, आयआयटी मुंबईमध्ये इंजिनीअरिंग आणि पॉलिसी शिकवतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: