अँजेला मर्केल युग मावळतीकडे : जर्मन सीडीयूने नवा नेता निवडला

अँजेला मर्केल युग मावळतीकडे : जर्मन सीडीयूने नवा नेता निवडला

युरोपमधील प्रमुख राजकारणी आणि जर्मन मतदारांनी २००५ पासून सातत्याने पसंती दिलेल्या अँजेला मर्केल यांची जागा आता आर्मिन लॅशेट घेणार आहेत.

जर्मनीत घटक पक्षांचे सरकार, मर्केल यांना धक्का
कोरोनाविरुद्धचे जर्मन मॉडेल आणि नेतृत्त्वाचे महत्त्व
जर्मनीतील खाद्यमहोत्सवातून बीफ करी मागे

बर्लिनः जर्मनीतील ख्रिश्चन डेमोक्रॅट्स पक्षाने शनिवारी अध्यक्ष म्हणून आर्मिन लॅशेट यांची निवड केली. विभाजित पक्षाला एकत्रित आणण्याचे काम आर्मिन लॅशेट यांना करावे लागणार असून, अँजेला मर्केल यांचे अध्यक्षपद त्यांना मिळू शकते.

जर्मनीच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर राईन-वेस्टफालिया – या पश्चिमेकडील प्रांतातील लॅशेट यांनी फ्रेडरिक मर्झ यांच्या विरुद्ध पक्षांतर्गत निवडणूक जिंकली. त्यांना ५२१ मते तर त्यांचे कट्टर-प्रतिस्पर्धी पुराणमतवादी मर्झ यांना ४६६ मते मिळाली. पक्षाच्या १००१ प्रतिनिधींनी ऑनलाईन मतदान केले.

सीडीयूच्या प्रमुख आणि युरोपातील प्रमुख राजकारणी अँजेला मर्केल यांनी २००५ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून, जर्मन मतदारांनी त्यांना सातत्याने पसंती दिली आहे. पण अध्यक्षपदाची निवडणूक आपण पुन्हा लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

“आपण या वर्षात एकत्र राहू शकू, असे काम मला करायचे आहे आणि आपण हे निश्चित केले पाहिजे की फेडरल निवडणुकीत पुढील अध्यक्ष हा आपल्या (सीडीयू / सीएसयू) युनियनचा असेल”, असे लॅशेट यांनी आपल्या विजयाच्या भाषणात सांगितले.

५९ वर्षांचे लॅशेट हे स्वतःला मर्केल यांचेच प्रतिनिधी म्हणून सादर करतात. लॅशेट यांच्याकडे अध्यक्षपदासाठी आवश्यक गोष्टी असल्याचे गेल्या वर्षी मर्केल यांनीच जाहीर करून कोणाला तरी प्रथमच पाठिंबा दिला होता.

नेहमी नसला तरी परंपरेनुसार, सीडीयू पक्षाचा अध्यक्ष सहसा जर्मनीच्या अध्यक्षपदाचा उमेदवार असतो.   सीडीयू आणि त्यांचा सहकारी पक्ष ख्रिश्चन सोशल युनियन (सीएसयू) आणि पुराणमतवादी गट येणारी फेडरल निवडणूक जिंकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तथापि, सर्वेक्षणांमध्ये दिसून आले आहे की ‘सीएसयू’ नेते पुराणमतवादी मार्कस सोडर आहेत यांना मतदारांची सर्वाधिक पसंती आहे. आरोग्यमंत्री जेन्स स्पेन यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी लढवावी अशी ‘सीडीयू’च्या काही खासदारांची इच्छा आहे, मात्र जेन्स स्पेन यांनी लॅशेट यांना पक्षाच्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा दर्शविला आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0