ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांचे निधन

ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांचे निधन

नवी दिल्लीः गेल्या आठवड्यात तामिळनाडूमध्ये भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याच्या दुर्घटनेत गंभीर जखमी असलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे बुधवारी

सीडीएस नियुक्तीचे निकष केंद्राने बदलले
हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १३ ठार
पायलटची चूक व खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले

नवी दिल्लीः गेल्या आठवड्यात तामिळनाडूमध्ये भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याच्या दुर्घटनेत गंभीर जखमी असलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले.

८ डिसेंबरला देशाच्या तिन्ही लष्कर दलाचे प्रमुख बिपीन रावत यांना घेऊन जाणारे लष्करी हेलिकॉप्टर दुपारी तामिळनाडूतील कोईम्बतूर ते सुलूर पट्ट्यात कोसळले होते. त्यात रावत यांच्यासह १४ जण होते. त्यापैकी रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह १३ जण ठार झाले होते आणि या दुर्घटनेत केवळ ग्रुप कॅप्टन वरूण सिंग बचावले होते. जखमी अवस्थेत वरूण सिंग यांना विलिंग्डन येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले होते व नंतर त्यांच्यावर बंगळुरूमध्ये उपचार सुरू होते. गेले ७ दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याचे हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितले. भारतीय हवाई दलातील एक शूरवीर जवान गमावल्याची संवेदना हवाई दलाने व्यक्त केली.

वरुण सिंग यांच्या दुर्दैवी मृत्यूवर पंतप्रधान, राष्ट्रपती, संरक्षण मंत्री व समाजातील अनेक थरातून शोकाकुल प्रतिक्रिया येत आहेत.

वरूण सिंग यांना गेल्याच ऑगस्ट महिन्यात शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0