अभिनंदन वर्धमान वीर चक्र पुरस्काराने सन्मानित

अभिनंदन वर्धमान वीर चक्र पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्लीः पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत शिरून त्यांचे एफ-१६ विमान पाडणारे भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा

‘पाषाण युगातून आधुनिक युगात आल्यासारखं वाटतंय’
मुंबई कोविड मॉडेलः अशक्य ते शक्य करता सायास…
गृहखात्यानेच अमित शहा यांचा ‘बॉम्ब’चा दावा फेटाळला

नवी दिल्लीः पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत शिरून त्यांचे एफ-१६ विमान पाडणारे भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा सोमवारी राष्ट्रपतींनी वीर चक्र देऊन सन्मान केला. वीर चक्र पुरस्कार हा भारतीय लष्करी दलातील तिसर्या क्रमांकाचा वीर सन्मान आहे. अभिनंदन यांनी पाकिस्तान विरुद्ध अद्वितीय असे साहस दाखवत, स्वतःची सुरक्षितता न पाहता देशाप्रती कर्तव्य बजावत आपल्या वीरतेचे अनन्यसाधारण प्रदर्शन केले आहे, अशा गौरवास्पद शब्दांत राष्ट्रपतींनी अभिनंदन वर्धमान यांचे कौतुक केले आहे.

सोमवारी राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम झाला. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री व तिन्ही लष्करातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फेब्रुवारी २०१९मध्ये जम्मू व काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. या मोहिमेचे नेतृत्व हवाई दलातील तत्कालिन विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे करत होते. त्यांनी आपल्या मिग-२१ बायसन या विमानातून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यादरम्यान त्यांचे मिग-२१ बायसन विमान पाकिस्तानने त्यांच्या हद्दीत पाडले. पण त्या दरम्यान अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ विमानही पाडले होते. या संघर्षात अभिनंदन पाकिस्तानच्या लष्कराला सापडले. पण त्यांची तीन दिवसांनंतर सुटका करण्यात आली होती. पाकिस्तानने पहिल्यांदा भारतीय हवाई दलाची दोन विमाने पाडल्याचे व त्यांच्या ताब्यात दोन वैमानिक असल्याचा दावा केला होता. नंतर हा दावा पाकिस्तानने मागे घेत आमच्याकडे भारताचा केवळ एकच वैमानिक आपल्याकडे असल्याचे स्पष्ट केले होते. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय पातळीवर चर्चा झाल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेला संबोधताना भारत-पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित व्हावी अशी आपली इच्छा असून शांतीचा संदेश देण्यासाठी पाकिस्तान त्यांच्या ताब्यात असलेल्या भारताच्या वैमानिकाची सुटका करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर १ मार्च २०१९मध्ये अभिनंदन लाहोर-वाघा बॉर्डरद्वारे भारतात परत आले.

अभिनंदन यांनी दाखवलेल्या या शौर्याबद्दल त्यांना २०१९मध्ये वीर चक्र देण्याची घोषणा करण्यात आली होती. काही महिन्यापूर्वी त्यांना हवाई दलाने बढती देत ग्रुप कॅप्टन केले होते.

अमेरिकेचे एफ-१६ विमान हे जगातील अत्याधुनिक व बलाढ्य असे लष्करी विमान समजले जाते व पाकिस्तानने अमेरिकेकडून ही लढाऊ विमाने घेतली आहेत. पण बालाकोट हल्ल्यात आपले कोणतेही एफ-१६ विमान भारताकडून पाडले गेले नाही असा पाकिस्तानचा दावा आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0