पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र टाकणारे तीन अधिकारी बडतर्फ

पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र टाकणारे तीन अधिकारी बडतर्फ

नवी दिल्लीः गेल्या ९ मार्च रोजी पाकिस्तानच्या हद्दीत चुकून तीन ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागल्याच्या आरोपावरून भारतीय हवाईदलाने आपल्या तीन अधिकाऱ्यांना से

महिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे
ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांचे निधन
अभिनंदन वर्धमान वीर चक्र पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्लीः गेल्या ९ मार्च रोजी पाकिस्तानच्या हद्दीत चुकून तीन ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागल्याच्या आरोपावरून भारतीय हवाईदलाने आपल्या तीन अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. मंगळवारी सरकारने या तीन अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याचे जाहीर केले.

हे तीनही अधिकारी हवाई दलाच्या अंतर्गत चौकशी दोषी आढळले होते. त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत क्षेपणास्त्र डागताना मानक संचालन प्रक्रियेचे (एसओपी) पालन केले नसल्याचे आढळून आले आहे. ही तीन क्षेपणास्त्रे सुमारे ४० हजार फुटावरून पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी अंतरावर पडली. या क्षेपणास्त्रांवर कोणतेही वॉर हेड नसल्याने त्यांचा स्फोट झाला नाही. त्यामुळे जीवितहानी झाली नाही, असे हवाई दलाच्या चौकशीत आढळून आले. पण या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे उभय देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

गेल्या काही वर्षांत भारत-पाकिस्तान संबंधात तणाव असून २०१९नंतर पुलवामा घटना, भारताचे बालाकोट प्रत्युत्तर या घटनांमुळे परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. त्यात निष्काळजीपणामुळे तीन क्षेपणास्त्रे पाकिस्तानात पडली होती. पाकिस्तानने या घटनेची तक्रार भारताकडे केली होती. त्यानंतर भारत सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

(छायाचित्र प्रतिकात्मक स्वरूपाचे)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0