कोविड-१९ लसः आयसीएमआर घाई करत आहे का?

कोविड-१९ लसः आयसीएमआर घाई करत आहे का?

नवी दिल्लीः येत्या १५ ऑगस्ट रोजी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)कडून कोरोना विषाणूवरची लस आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची पुण्यात चाचणी सुरू
आता देशातल्या ७५ कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांवर लक्ष
लॉकडाऊनमध्ये ते चालले २९०० किमी

नवी दिल्लीः येत्या १५ ऑगस्ट रोजी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)कडून कोरोना विषाणूवरची लस आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच अशा गंभीर महासाथीवर लस आणण्याची घाई योग्य ठरणार नाही, अशी मते वैद्यकीय क्षेत्रातून उमटू लागली आहेत. ही मते प्रसार माध्यमात येताच शनिवारी आयसीएमआरने आम्ही आंतरराष्ट्रीय निकष पाळत असल्याचे स्पष्टीकरण दिले.

१५ ऑगस्ट ही तारीख देण्यामागचे एक कारण असे की, या दिवशी देशाचा स्वातंत्र्य दिन असून त्या दिवशी लशीची घोषणा केल्यास  पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या विरोधकांवर राजकीय मात करतील असा अंदाज वर्तवला जात होता.

आयसीएमआरचे मुख्य संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी २ जुलै रोजी क्लिनिकल परीक्षणासंदर्भात १२ संस्थांना पत्रे पाठवली. या पत्रव्यवहारात भारत बायोटेक या कंपनीच्या मदतीने कोव्हॅक्सिन नावाच्या लशीच्या मानवी चाचण्यांना लवकरात लवकर मंजुरी द्यावी असा आग्रह धरण्यात आला होता. या मंजुरीत सरकारी अनावश्यक लालफितशाही आणू नये व लस विकसित करण्याबाबत सहकार्य अधिक वाढावे, असेही नमूद करण्यात आले होते. कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस असून भारतीय औषध महानियंत्रकांनी दोन टप्प्यात या लशीच्या मानवी चाचणीस परवानगी दिल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. देशाच्या व्यापक सार्वजनिक आरोग्य हित लक्षात घेऊन लशीच्या उत्पादनात गती आणणे महत्त्वाचे आहे, असेही म्हटले गेले होते.

पण यासंदर्भात खुद्द भारत बायोटेकच्या प्रवक्त्यांनी अशी लस येत्या ऑक्टोबरपर्यंत तरी बाजारात येईल याची शक्यता वाटत नाही, या लशीच्या दोन क्लिनिकल ट्रायल असल्याने त्याला विलंब लागेल, असे स्पष्ट केले आहे.

वैज्ञानिक जगताकडून घाईवर आक्षेप

पण आयसीएमआरने कालनिश्चिती ठेवल्याने त्यावर वैद्यकीय वर्तुळातून टीका होऊ लागली आहे. लस विकसित करण्याला वेळ दिला पाहिजे तिला कालमर्यादेत ठेवता येत नाही व ती कमी ठेवून लस आणता येत नाही, असे वैज्ञानिक व डॉक्टरांचे म्हणणे आहे.

एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या मते लशीचा प्रभाव व सुरक्षितता या दोन प्रमुख बाबींवर लक्ष ठेवले पाहिजे व ते आव्हानात्मक आहे. जर आपल्याला पहिला परिणाम अपेक्षित मिळाला तर दुसर्या वेळेस मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन हे आव्हान आहे, असे गुलेरिया यांचे म्हणणे आहे.

विषाणूतज्ज्ञ व वेलकम ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी शहीद जमाल यांनी १५ ऑगस्ट ही कालमर्यादा निरर्थक असल्याचे म्हटले आहे. असे केल्याने संपूर्ण जगातील वैज्ञानिक समाज आपल्यावर हसेल. तसे होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. भारत विज्ञानाच्या बाबतीत गंभीर पावले टाकणारा देश आहे, अशा परिस्थितीत आपण चुकीची पावले उचलल्यास आपल्यावर कोण भरवसा ठेवेल असा सवाल जमाल यांनी केला आहे.

आपण लस जरी आणली तरी त्यावर जग विश्वास ठेवेल का असा सवाल करत आयसीएमआरच्या पत्रातील भाषा विनंती नव्हे तर धमकी असल्याचेही जमाल म्हणाले.

अन्य एक विषाणू तज्ज्ञ उपासना राय यांनी कोणतीही घाई प्रशंसायोग्य असली तरी आपण खूपच घाई करत असल्याची प्रतिक्रिया दिली.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: