शाहीन बागमधील उत्स्फुर्त प्रजासत्ताक दिन

शाहीन बागमधील उत्स्फुर्त प्रजासत्ताक दिन

नवी दिल्ली : १५ डिसेंबरपासून वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या विरोधात ठाण मांडून बसलेल्या दिल्लीतल्या शाहीन बागमधील नागरिकांनी देशाचा ७० वा प्रजासत्ताक दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा केला. रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने नागरिक शाहीन बाग परिसरात जमा झाले. यात महिलांसोबत पुरुषांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. नागरिकांच्या हाती भारताचा झेंडा होता. आंदोलकांनी राष्ट्रगीत म्हटल्यानंतर राज्यघटनेच्या सरनाम्याचेही (प्रस्तावना) सामूहीक वाचन करण्यात आले. हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्नच बंधुभावाचे नारे देण्यात आले. नागरिकांच्या हाती डॉ. आंबेडकरांचा फोटो व राज्यघटनेची प्रतही दिसून आली. शाहीन बागमधील सर्वात वयोवृद्ध असलेल्या तीन महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रोहित वेमुलाची आई राधिका वेमुलाही उपस्थित होत्या.  जेएनयू विद्यार्थी नेत्या आयेशी घोष, जिन्गेश मेवानी, उमर खालीद आदी उपस्थित होते.

 

COMMENTS