राज्यसभेत भाजपची शंभरी, काँग्रेसचे केवळ ३० सदस्य

राज्यसभेत भाजपची शंभरी, काँग्रेसचे केवळ ३० सदस्य

नवी दिल्लीः लवकर होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकांनंतर राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसच्या जागा कमी झालेल्या (३०) दिसणार आहेत तर भाजपची सदस्य

एसपी-डीआयजी पदांना केंद्रात प्रतिनियुक्ती सक्तीची
नागरिकत्त्व कायद्याला विरोध वाढला
गेला ‘माधव’ कुणीकडे

नवी दिल्लीः लवकर होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकांनंतर राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसच्या जागा कमी झालेल्या (३०) दिसणार आहेत तर भाजपची सदस्य संख्या १००च्या पुढे जात असल्याचे चित्र दिसत आहे.

१९६२-६४ या साली काँग्रेसचे राज्यसभेतील संख्याबळ १६२ पर्यंत गेले होते, त्यानंतर १९८८-९०नंतर या पक्षाचे राज्यसभेतील संख्याबळ आस्ते आस्ते कमी होत गेले. १९९०-९२मध्ये काँग्रेसचे राज्यसभेत ९९ खासदार होते. आता २०२२ मध्ये ही संख्या ३० पर्यंत खाली आहे.

काँग्रेसचे हे पतन दिसत असताना काँग्रेसचा मित्र पक्ष द्रमुकची राज्यसभेतील सदस्य संख्या ३१ इतकी होणार आहे. काँग्रेसचे सध्याचे राज्यसभेतील सदस्यबळ ३३ इतके आहे पण त्यांची संख्या तीनने कमी होत आहे. तर भाजपची सदस्य संख्या १०१ होत असून एनडीएची सदस्य संख्या ११७ पर्यंत जाऊ शकते. सध्या राज्यसभेची एकूण सदस्य संख्या २३६ इतकी आहे.

भाजपकडून गाठली जात असलेली शंभरी २०१४च्या लोकसभा निवडणुकांमुळे होत आहे. २०१२-१३मध्ये भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ ४७ होते ते केवळ १० वर्षांत दुप्पट होताना दिसत आहे.

या वर्षी राज्यसभेच्या एकूण ७५ जागा रिक्त होत आहेत. ३१ मार्चला १३ जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. आता उर्वरित ६२ जागांच्या निवडणुका होत जाणार आहेत. या निवडणुका उ. प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान, बिहार, कर्नाटक, ओदिशा व मध्य प्रदेशातील जागांसाठी होत असून बहुसंख्य राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागत आहे.

आता राज्यसभेत काँग्रेसची सदस्य संख्या वेगाने कमी होत असताना भाजपची संख्या वाढल्याने कोणतेही विधेयक संमत करताना भाजपाला यापुढे फारशी अडचण पडणार नाही असे चित्र आहे. राज्यसभेत भाजपला बहुमत नसले तरी त्यांना दोनेक मित्र पक्ष साथीला मिळतील. लोकसभेत भाजपकडे बहुमत आहे.

राज्यसभेतल्या काँग्रेसच्या घसरत्या सदस्यसंख्येबरोबर काँग्रेसप्रणित यूपीए आघाडीचे लोकसभेतील स्थान चिंताजनकच आहे. हरयाणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम व त्रिपुरा या राज्यांतून लोकसभेत यूपीए आघाडीतील एकाही पक्षाचे प्रतिनिधित्व नाही. काँग्रेसला नुकताच पंजाबमध्येही पराभवाचा फटका बसला होता, त्यामुळे उ. भारतातील प्रतिनिधित्व करणारी सदस्यसंख्याही काँग्रेसकडे शिल्लक राहिलेली नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: