सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबरला उद्‍घाटन

सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबरला उद्‍घाटन

मुंबई: कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी मुख्यमंत

राज्यात विमानतळावर आणखी कडक निर्बंध
किव्ह विमानतळ रशियाच्या ताब्यात
उत्तराखंडात हत्तींच्या वनावर विमानतळाचे अतिक्रमण

मुंबई: कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्‍घाटन होणार आहेअशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

देसाई यांनी सांगितलेउद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करुन विमानतळाचे काम पूर्ण केले आहे. एकूण २८६ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली असून सुमारे ५२० कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. आयआरबीसिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. यांना विमानतळ उभारणीफायनान्स तसेच ऑपरेशन्स (DBFO) साठी लीजवर हे काम देण्यात आले आहे. त्यांनी हा खर्च केला आहे. विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणा-या पाण्याचा पुरवठारस्ते विकास, संरक्षण भिंत या सारखी कामे एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून १४ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

 

विमान पत्तन प्राधिकरण (Airport Authority of India), नागरी विमान महानिदेशालय (DGCA) यांच्यातर्फे लागणारे सर्व परवाने प्राप्त झाले आहेत. विमानतळासाठी विकासकरार झाले आहेत. या विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विमानतळामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळेलपर्यटन व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. कोकणाचे आकर्षण असलेल्या  समुद्रापर्यंत आता विमानवाहतूक सुरू झाल्यामुळे अधिकाअधिक पर्यटकांना पोहचता येईल. कोकणवासियांची उत्कर्षाकडे वाटचाल सुरू असल्याचे देसाई यावेळी म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0