राज्याच्या रेमडेसिवीर पुरवठ्यात वाढ

राज्याच्या रेमडेसिवीर पुरवठ्यात वाढ

मुंबई: राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधानांना

‘संपूर्ण लॉकडाऊनमुळे खेड्यापाड्यात कोरोना पसरू शकतो’
भारतात ४० कोटी बेरोजगार : आंतरराष्ट्रीय मजूर संघटना
बिदाल आणि गोंदवले गावांनी निवडला कोरोनामुक्त मार्ग!

मुंबई: राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. शनिवारी केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे.

शनिवारी केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की, २१ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेमडेसिवीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0