राज्यात मेडिकल कॉलेजमधील जागा वाढवल्या

राज्यात मेडिकल कॉलेजमधील जागा वाढवल्या

मुंबई: वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुस

‘तबलिगी जमातः खोट्या वृत्तातून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न’
बंगालमध्ये नड्डा यांच्या गाडीवर दगडफेक
कोरोना आणि अवनतीकडे जाणारा समाज  

मुंबई: वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नव्याने वाढविण्यात आलेली महाविद्यालय निहाय प्रवेश क्षमता याप्रमाणे आहे.

मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज व नायर चॅरिटेबल रुग्णालयात डी. एम. नेफ्रॉलॉजी (D.M. Nephrology) या विषयाकरिता विद्यार्थी प्रवेश क्षमतावाढ १ वरून ३ करण्यात आली आहे.

तर यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी. ॲनेस्थेसियोलॉजी (MD Anaesthesiology) या विषयात सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश क्षमता ४ असणार आहे.

स्वामी रामानंदतीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे एम. डी. जनरल मेडिसीन (MD General Medicine) आणि एम. एस. जनरल सर्जरी या दोन विषयातील अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत अनुक्रमे ३ वरून ६ आणि ३ वरून ५ इतकी वाढ करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. डी. मायक्रोबॉयलॉजी (M.D. Microbiology), एम. डी. पॅथोलॉजी (M.D. Pathology), एम. डी.  फार्माकॉलॉजी (M.D. Pharmacology), एम. डी. रेसपीरेटरी मेडिसीन (M.D. Respiratory Medicine) या चार अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे ३, ४, ३ आणि २ इतकी विद्यार्थी प्रवेश क्षमता नव्याने करण्यात आली आहे. या शिवाय याच वैद्यकीय महाविद्यालयात एम. डी. ॲनेस्थेसियोलॉजी (M.D. Anaesthesiology), एम. डी. (M. D. Otorhinolaryngology), एम. डी. जनरल मेडिसीन (M. D. General Medicine), एम. एस. जनरल सर्जरी (M. S. General Surgery), एम. एस. अबस्टेट्रीक्स आणि गॉयनाकॉलॉजी  (M. S. Obstetrics & Gynaecology), एम. डी. बॉयो केमिस्ट्री (M. D. Bio Chemistry), आणि एम. एस. ऑप्थलमोलॉजी (M. S. ophthalmology), या ७ अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे ४, ३, ९, ३, ३, ४ आणि २ इतकी विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढ करण्यात आली आहे.

एम. डी. रेडिओ डॉयगॉनासिस (M.D. Radio- diagnosis) आणि एम.डी पेडियॉट्रीक्स (M.D. Paediatrics) या २ विषयात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश क्षमतेत अनुक्रमे ५ वरून ६ आणि ४ वरून ६ इतकी वाढ करण्यात आली आहे.

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. डी. डरमॅटोलॉजी, वेनेरीओलॉजी आणि लेप्रोसी (M.D. Dermatology, Venereology & Leprosy) या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली असून येथील  विद्यार्थी प्रवेश क्षमता ३ असणार आहे.

पुण्यातील बी. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. डी. इमरजन्सी मेडिसीन (M. D. Emergency Medicine), हा अभ्यासक्रम ३ विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: