भारतात कोरोनाचे एकूण रुग्ण ३० लाखांवर

भारतात कोरोनाचे एकूण रुग्ण ३० लाखांवर

नवी दिल्लीः गेले ५ दिवस देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दरदिवशी ६० हजाराहून अधिक वाढत असून रविवारी देशातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा ३०

‘तरीही आमचा लढा सुरूच’ : शाहीनबाग आंदोलकांचा निर्धार
ऑटो इंडस्ट्रीपुढे कुशल कामगार मिळण्याचे आव्हान
देशात २१ हजार शिबिरात साडे सहा लाख स्थलांतरित

नवी दिल्लीः गेले ५ दिवस देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दरदिवशी ६० हजाराहून अधिक वाढत असून रविवारी देशातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा ३० लाखाच्या पुढे गेला आहे.

१६ दिवसांपूर्वी म्हणजे ७ ऑगस्टला कोरोना संक्रमणाचा आकडा २० लाखाच्या पुढे गेला होता. पण गेल्या १६ दिवसांत एक लाखाने रुग्ण संख्या वाढली आहे. रविवारी सकाळपर्यंत ६९,२३९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या महासाथीत गेल्या २४ तासात ९१२ तर कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर आजपर्यंत एकूण ५६,७०६ नागरिक मरण पावले तर २२ लाख ८० हजार ५६६ रुग्ण ठणठणीत बरे झाले. या आजारामुळे बरे होणार्याची आकडेवारी ७४.९० टक्के तर मृत्यूदर कमी होऊन तो १.८६ टक्के झाला आहे. सध्या देशात ७० लाख ७ हजार ६६८ रुग्णांवर उपचार चालू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

जगात कोरोनाचे रुग्ण २ कोटीहून अधिक

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार जगभरात कोरोना संक्रमणाचा आकडा २ कोटी ३२ लाख ८ हजार ४९२ इतका झाला असून एकूण मृत्यू ८ लाख ४ हजार ४७४ इतके झाले आहेत.

कोरोना महासाथ अमेरिकेत सर्वाधिक पसरली असून येथे संक्रमणाचा आकडा ५६ लाख ६८ हजार २४५ इतका झाला असून १ लाख ७६ हजार ३६२ नागरिक कोरोनामुळे मरण पावले आहेत.

अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाची साथ पसरली असून तेथे ३५ लाख ८२ हजार ३६२ रुग्णांची नोंद असून मरण पावलेल्यांची संख्या १ लाख १४ हजार २५० इतकी झाली आहे.

कोरोना संक्रमणाच्या महासाथीत अमेरिका, ब्राझीलनंतर भारताचा क्रमांक तिसरा असून चौथा क्रमांक रशियाचा आहे. रशियामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ लाख ४९ हजार ५३१ असून १६,२६८ मृत्यू झाले आहेत. पाचव्या क्रमांकावर द. आफ्रिका असून तेथे ६ लाख ७ हजार ४५ कोरोना रुग्णांची नोंद आहे व १२,९८७ मरण पावले आहेत.

काही महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर असलेला स्पेन आता १० व्या क्रमांकावर घसरला असून तेथे शनिवारी कोरोना रुग्णांची आकडेवारी ३ लाख ८६ हजार ५४ इतकी नोंदली गेली आहे तर मृतांचा आकडा २८,८३८ इतका झाला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0