भारत आणि पीएलएमध्ये गलवानजवळ पुन्हा चकमक?

भारत आणि पीएलएमध्ये गलवानजवळ पुन्हा चकमक?

नवी दिल्ली: चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात पीएलएने पूर्व लदाखमध्ये पुन्हा एकदा प्रत्यक्ष ताबारेषेचे (एलएसी) उल्लंघन केले आणि पीएलए व भारतीय लष्कर

ट्विटरवर अरब जगतातून ‘बॉयकॉट इंडिया’चा ट्रेंड
‘कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी’
कोरोनाचा आकड्यांचा खेळ

नवी दिल्ली: चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात पीएलएने पूर्व लदाखमध्ये पुन्हा एकदा प्रत्यक्ष ताबारेषेचे (एलएसी) उल्लंघन केले आणि पीएलए व भारतीय लष्करामध्ये ‘किमान एक चकमक’ घडली, अशी बातमी ‘बिझनेस स्टॅण्डर्ड’ने दिली आहे.

ही चकमक गलवान नदीपासून जवळच झाल्याचे संरक्षण विश्लेषक अजय शुक्ला यांनी सांगितले. गेल्या वर्षी जून महिन्यात ज्या हिंसक चकमकीत २० भारतीय सैनिक मारले गेले होते, त्या स्थळापासून हे स्थळ जवळच आहे, असेही त्यांनी नमूद केले. आत्ताच्या चकमकीत प्राणहानी झाली की नाही हे समजू शकले नाही, असेही ते म्हणाले.

बिझनेस स्टॅण्डर्डच्या बातमीतील दावे भारतीय लष्कराने फेटाळले आहेत. “यावर्षी फेब्रुवारी महिन्यात विच्छेदन करार झाल्यापासून कोणत्याही बाजूने विच्छेदनाच्या क्षेत्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. या लेखात म्हटल्याप्रमाणे गलवान किंवा अन्य कोणत्याही भागात चकमक झालेली नाही,” असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.

चीनसोबत झालेला करार मोडून पडल्याचा लेखातील दावा ‘चुकीचा आणि निराधार’ आहे, असा आरोपही लष्कराने केला आहे.

“वादाच्या मुद्दयांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजू सातत्याने वाटाघाटी करत आहेत आणि संबंधित भागांमध्ये नियमित गस्त घातली जात आहे. आत्तापर्यंत तरी परिस्थिती अशीच आहे. पीएलएच्या हालचालींवर भारतीय लष्कराची कडक नजर आहे,” असे भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

विच्छेदन करारानुसार मोकळी केलेली अनेक ठिकाणे पीएलएने पुन्हा बळकावली आहेत. यामध्ये पँगाँग त्सोच्या काठावरील काही ठिकाणे तसेच कैलाश रांगांमधील ठिकाणे आदींचा समावेश होतो, असे बिझनेस स्टॅण्डर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांतात म्हटले आहे.

दरम्यान भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बुधवारी दुशांबेला भेट झाली. त्या पार्श्वभूमीवर लष्कराने चकमक घडलीच नाही अशा आशयाचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

गलवान नदीतील एका वळणावर पीएलएच्या सैनिकांनी तंबू लावल्यावरून दोन्ही लष्करांमध्ये वाद झाल्याचे बिझनेस स्टॅण्डर्डच्या वृत्तांतात म्हटले आहे. हा तंबू गस्तीचे ठाणे क्रमांक १४च्या जवळ होता आणि हे बफर क्षेत्र असल्याने तंबू काढून टाकावा अशी मागणी भारतातर्फे करण्यात आली होती.

२०२० सालच्या उन्हाळ्यात पीएलने एलएसीच्या भारताच्या बाजूच्या भागातील अनेक ठिकाणे बळकावली होती पण तरीही २०२१ सालच्या एप्रिल महिन्यात दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. त्याचवेळी चिनी ड्रोन मोठ्या संख्येने भारताच्या हवाईक्षेत्रात शिरू लागले होते, असेही या वृत्तांतात म्हटले होते.

“साध्या वेशातील पीएलए सैनिकांची संख्या बरीच वाढल्याची बातमी दक्षिण लदाखमधील डेमचोक व चुमार भागांमधील भारतीय गस्तपथकांनी मे-जूनमध्येच दिली होती,” असे शुक्ला यांच्या अहवालात म्हटले आहे. मे महिन्याच्या मध्यावर भारताकडून कोणतीही चिथावणी मिळालेली नसताना पीएलएने पूर्वी मोकळ्या केलेल्या अनेक जागा पुन्हा बळकावायला सुरुवात केली. यामुळे तणाव निर्माण झाला आणि भारतीय लष्करालाही या भागांत अधिक सैन्य तैनात करणे भाग पडले.

पीएलएने रशियन एस-फोर हंडरेड संरक्षक क्षेपणास्त्रांच्या दोन तुकड्या तैनात केल्या असाव्यात. यामुळे भारताच्या हवाई युद्धातील श्रेष्ठत्वाला आव्हान मिळू शकेल. या संरक्षण प्रणालीमध्ये भारताची ४०० किलोमीटर पल्ल्यातील विमाने पाडण्याची क्षमता आहे, असे बिझनेस स्टॅण्डर्डने प्रसिद्ध केलेल्या वृत्तांतात म्हटले आहे.

पीएलए एलएसीलगतची आपली शक्ती वाढवत आहे, असा इशारा अन्य काही अहवालांमध्येही देण्यात आला आहे. मात्र, यापैकी एकाही अहवालात चकमकीचा उल्लेख नाही.

चीनने हिवाळी तैनात अक्साई चीन भागात वाढवली आहे. यामध्ये कायमस्वरूपी बांधकामे, निवासाच्या सुविधा तसेच लष्करी इमारतींचा समावेश आहे,” असे इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तांतात म्हटले आहे.

भारत सरकारच्या मूल्यमापनानुसार डेपसांग हे चीनचे मध्यवर्ती लक्ष्य आहे, कारण, भारतीय सैनिकांचा चीनच्या जी-२१९ या रस्त्याला लागण्याचा मार्ग डेपसांगमधून जातो. जी-२१९ हा रस्ता तिबेटला शिंजियांगशी जोडतो.

“हा रस्ता पीएलए आणि पाकिस्तानी लष्कराला विश्वासाच्या पूरक मार्गांवर घेऊन जातो. या रस्त्यांद्वारे ते एकाचवेळी पुढे येऊन एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. यामुळे भारताचा उत्तर टोकाशी असलेला संपर्क तुटू शकतो. यात काराकोरम पास, डीबीओ (दौलतबाग ओल्डी) आणि सियाचीन ग्लेशिअर सेक्टरचा समावेश होतो,” असे बिझनेस स्टॅण्डर्डच्या वृत्तांतामध्ये म्हटले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिझनेस स्टॅण्डर्डमधील वृत्तांताचा स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट केला होता आणि “भारत सरकारने परराष्ट्र व संरक्षण धोरणांचा वापर देशांतर्गत राजकीय साधने म्हणून केल्यामुळे देश कमकुवत झाला आहे. आपण एवढे स्खलनशील कधीच नव्हतो” अशा आशयाची कॅप्शन त्याला दिली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: