भारताच्या सिस्टिमवर चीनचे सायबर हल्ले

भारताच्या सिस्टिमवर चीनचे सायबर हल्ले

चीन सरकारचे समर्थन असणार्या एका हँकिंग ग्रुपने भारतातील कोरोना लसींची निर्मिती करणार्या सीरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक या दोन औषधी कंपन्यांच्या आयटी

चीनचे यान चंद्रावर उतरले
कोरोनावर आयुर्वेद, होमिओपॅथी सुचवल्याने सरकारची खिल्ली
कडाक्याच्या हिवाळ्यामुळे पँगॉगजवळील सैन्याची माघारी?

चीन सरकारचे समर्थन असणार्या एका हँकिंग ग्रुपने भारतातील कोरोना लसींची निर्मिती करणार्या सीरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक या दोन औषधी कंपन्यांच्या आयटी सिस्टिमवर हल्ला केल्याची माहिती सायफिर्मा या सायबर इंटेलिजन्स फर्मने दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

कोविड लसीच्या उत्पादनावरून भारत व चीनमध्ये फार्मा उद्योगामध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे, त्यात भारताकडून सर्वाधिक लसींचे उत्पादन केले जात असल्याने चीनच्या सायबर हॅकर्सकडून भारतीय कंपन्यांना लक्ष्य केले जात आहे.

सायफिर्मा ही गोल्डमन सॅश या कंपनीची साहाय्यकारी कंपनी असून ती सिंगापूर व टोकयो येथे कार्यरत आहे. या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार चीनचा हॅकिंग ग्रुप ‘एपीटी-10’ उर्फ ‘स्टोन पांडा’ याने भारतीय औषधी कंपन्यांच्या आयटी सिस्टिमधील काही कच्चेदुवे शोधून त्यावर हल्ला केला आहे. भारतीय औषधी कंपन्यांच्या आयटी सिस्टिममध्ये शिरकाव करून बौद्धिक संपदेची माहिती चोरणे व त्या आधारे भारतीय औषधी कंपन्यांवर व्यवसायावर परिणाम करणे यासाठी चीनचे हे हल्ले असल्याचे सायफ्रिमाचे मुख्य कुमार रितेश यांचे म्हणणे आहे. कुमार रितेश हे ब्रिटिनचे गुप्तहेर खाते एमआय सिक्सचे माजी अधिकारी आहेत.

या हल्ल्याच्या संदर्भात चीनच्या परराष्ट्र खात्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर सीरम व भारत बायोटेकनेही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मुंबईचा वीजपुरवठाही चीनच्या हॅकर्सनी बंद पाडला होता?

दरम्यान चीनच्या हॅकर्सनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईला वीज पुरवठा करणार्या कंपन्यांच्या आयटी सिस्टिमवरही हल्ला करून शहरातला वीज पुरवठा बंद पाडल्याची घटना सोमवारी उघड झाली. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची चौकशी सुरू केल्याचे सोमवारी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी भारत-चीनमध्ये सीमारेषेवरून तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर गेल्या १२ ऑक्टोबरमध्ये मुंबईच्या वीज यंत्रणांवर सायबर अटॅक करत शहरातील दोन तास वीज गायब झाली होती. तसेच रेल्वे सेवा, रुग्णालय सेवा ठप्प झाली होती. हे होण्यामागे कारण चीनच्या RedEcho या हॅकर्स ग्रुपने भारतीय वीज यंत्रणांवर हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते, असा दावा मॅसॅच्युएट्सस्थित एक कंपनी रेकॉर्डेड फ्युचरचे म्हणणे आहे. या कंपनीने दावा केला की चीनच्या RedEchoने भारतातील वीज ग्रीड यंत्रणांना लक्ष्य करण्यासाठी आयटी सिस्टिमवर हल्ले केले होते. चीनच्या RedEchoकडे अत्याधुनिक सायबर इन्ट्रुजन तंत्रज्ञान असून त्यांनी भारताच्या वीज ग्रीड यंत्रणांमध्ये काही नोडमध्ये शिरकाव करून वीज निर्मिती व वीजपारेषण व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला होता.

पण या हल्ल्या संदर्भात भारताने व चीनने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: