गलवान खोऱ्यातील हिंसेला चीन जबाबदार

गलवान खोऱ्यातील हिंसेला चीन जबाबदार

नवी दिल्लीः लडाखमधील गलवान खोर्यातल्या हिंसाचार प्रकरणात भारताने चीनला जबाबदार धरले आहे. चीनचा हा हल्ला पूर्वनियोजित असून उभय देशांनी सीमेवर तणाव वाढू

चीन, ‘डब्ल्यूएचओ’ आणि तैवान – भाग २
सैन्य मागे घेण्याबाबत सरकारद्वारे जनतेची दिशाभूल: कर्नल शुक्ल
वुहानला मुंबईने मागे टाकले

नवी दिल्लीः लडाखमधील गलवान खोर्यातल्या हिंसाचार प्रकरणात भारताने चीनला जबाबदार धरले आहे. चीनचा हा हल्ला पूर्वनियोजित असून उभय देशांनी सीमेवर तणाव वाढू नये यासाठी सल्ला मसलत केली असताना चीनने आगळीक करून २० भारतीय जवानांना ठार मारले असा आरोप परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी केला.

गलवान खोर्यातील आगळीक चीनचा पूर्वनियोजित कट होता, त्यांना जमिनीवरची परिस्थिती बदलायची होती. चीनच्या अशा कृतीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर गंभीर परिणाम होतील अशीही भीती जयशंकर यांनी व्यक्त केली आहे.

गलवान खोर्यातील परिस्थिती जगापुढे ठेवण्यासाठी भारतीय परराष्ट्रखात्याने एक पत्रक जारी केले असून ६ जूनच्या उभय देशांच्या बैठकीत एलएएसीवरून परिस्थिती तणावाची होऊ नये यासाठी पावले उचलण्यावर सहमती झाली होती. दोन्ही देशांनी गलवान खोरे, पँगाँग त्सो लेक व हॉट स्प्रिंग या तीन वादग्रस्त भागांवर चर्चा करण्यावर भर दिला होता. पण नंतर चीनने गलवान खोर्यात भारताच्या हद्दीत काही बांधकामे बांधण्यास सुरूवात केली व त्यावरून विषय चिघळत गेला. त्यामुळे चीनने आपल्या कृत्याचे आत्मपरिक्षण करून योग्य पावले उचलावीत असे या पत्रकात म्हटले आहे.

परिस्थितीला भारतच जबाबदारः चीनचा आरोप

भारतीय परराष्ट्रखात्याने चीनवर आरोप करताना जी भाषा वापरली त्याच भाषेत चीननेही भारतावर परिस्थिती चिघळवल्याचा आरोप केला आहे. भारताच्या सैन्याने एलएसी ओलांडून चीनच्या हद्दीत प्रवेश केला व चीनी सैन्याला चुचकारले. भारताने उभय देशांमध्ये मान्य झालेल्या कराराचा भंग करून आपले सैन्य घुसवले व आंतरराष्ट्रीय कराराला पायदळी तुडवले असून चिनी सैनिकांवर हल्ले करणार्या भारतीय सैनिकांची चौकशी करावी अशी मागणी चीनने केली आहे. भारताने सद्य परिस्थिती योग्य आकलन करावे, आणि चीनच्या भूमिकेला कमी लेखू नये. चीन आपल्या सार्वभौम प्रदेशाच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असल्याचे चीनने म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: