जीडीपी ४.५ टक्क्यांवर घसरला, ६ वर्षांतला नीचांक

जीडीपी ४.५ टक्क्यांवर घसरला, ६ वर्षांतला नीचांक

नवी दिल्ली : देशाचा जीडीपी गेल्या ६ वर्षांत सर्वात कमी झाला असून दुसऱ्या तिमाहीत केवळ ४.५ टक्के स्थिरावला असल्याची माहिती सरकारने दिली. एका वर्षांपूर्

विधायक राष्ट्रवादाची हाक
पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात
अर्थव्यवस्थेवर श्वेतपत्रिका हवीच

नवी दिल्ली : देशाचा जीडीपी गेल्या ६ वर्षांत सर्वात कमी झाला असून दुसऱ्या तिमाहीत केवळ ४.५ टक्के स्थिरावला असल्याची माहिती सरकारने दिली. एका वर्षांपूर्वी जीडीपी ७ टक्के होता तो यंदा अडीच टक्क्याने घसरला असून ही घसरण अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या ८ पायाभूत क्षेत्रातील खराब कामगिरीमुळे झाल्याचे सरकारच्या आकडेवारीवरून दिसते. या ८ क्षेत्रातील कामगिरी ५.८ टक्के इतकी आहे.

भारताचा आर्थिक विकासाचा दर कमी होत असल्याची जी चिंता सरकार व्यतिरिक्त अन्य घटकांकडून केली जात होती ती सध्याची आकडेवारी पाहता खरी असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत याच दुसऱ्या तिमाही जीडीपी ४.९ टक्के होता तो आता ४.५ टक्के इतका खाली आला आहे. खाण व बांधकाम क्षेत्रातील मंदी याला कारण असून पहिल्या तिमाहीतील निर्मितीक्षम क्षेत्राची कामगिरी दुसऱ्या तिमाहीत समाधानकारक नसल्याचे आढळून आले आहे.

शुक्रवारी जी आकडेवारी प्रसिद्ध झाली होती त्याचे अंदाज पूर्वी काही विश्लेषकांनी मांडले होते. त्यांच्या अंदाज दुसऱ्या तिमाही देशाचा जीडीपी ४.२ ते ४.७ टक्क्यांपर्यंत राहील असा होता. तो अंदाज खरा ठरला.

वित्तीय तिमाही  : जीडीपी वाढ

एप्रिल-जून (२०१८-१९) : ८.० टक्के

जुलै-सप्टें (२०१८-१९) : ७.० टक्के

ऑक्टो-डिसें (२०१८-१९) : ६.६ टक्के

जाने-मार्च (२०१८-१९) : ५.८ टक्के

एप्रिल-जून (२०१८-१९) : ५.० टक्के

जुलै-सप्टें (२०१८-१९) : ४.५ टक्के

महसूल तूटही वाढली

गेल्या ७ महिन्यात एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत- सरकारला ६.८३ लाख कोटी रुपये महसूल मिळाला होता आणि खर्च मात्र १६.५५ लाख कोटी रु. झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही महसूल तूट ७.२ ट्रिलियन रुपये (१००.३२ अब्ज डॉलर)इतकी  राहिली असून ती अर्थसंकल्पातील लक्ष्याच्या १०२.४ टक्के जास्त आहे.
मोदींचे स्वप्न उशीरा पण साध्य होईल

एकीकडे आर्थिक विकासाचा दर खाली येत असताना देशाचे माजी अर्थसचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी यावर चिंता व्यक्त न करता, भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे स्वप्न होते ते या मंदीमुळे एक वर्ष पुढे ढकलले असे ट्विट केले आहे. याच गर्ग यांची गेल्या वर्षी सरकारने काही मुद्द्यांवर सहमती न झाल्याने अर्थखात्यातून बदली केली होती. या बदलीने ते नाराज झाले व त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0